उत्तेजना अशी तू देऊ नकोस
मराठी गझल
महागजल
उत्तेजना अशी तू देऊ नकोस वाऱ्या
मी पंख कापले बघ, माझ्यात मी स्थिराया
स्वस्तात मागते जी आलू लसूण कांदा
तीही तयार नाही अजिबात भाव द्याया
मी हारलो युगात्म्या वस्तीत पांगळ्यांच्या
बसलो उगीच होतो आयुध तुझे विकाया
आयुष्य थोडके अन् गंतव्य लांब आहे
होणार साध्य काही की जाणार जन्म वाया
- Read more about उत्तेजना अशी तू देऊ नकोस
- 1 comment
- Log in or register to post comments
- 5579 views

Recent comments ताजे प्रतिसाद