Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

कास्तकारायन...(वऱ्हाडी बोली ) दीर्घ कवितासंग्रह

Main page content

ravindradalvi
By ravindradalvi | 2:39 PM IST, Tue November 17, 2026
ग्रामीण कवितेचे रसग्रहण

कास्तकारायन...(वऱ्हाडी बोली ) दीर्घ कवितासंग्रह

जे आपल्या मनाले भावते, ते वाचालेई आवळत असते,असं म्हना का त्या पुस्तकात आपून सोताले सोधत असतो. ज्या वक्ती म्या 'कास्तकारायन' वाचलं... तवाच... मले ते आवळलं असं म्हननार नाई त् ते आपलं वाटलं. या दिर्घ वऱ्हाडी काव्यसंग्रहाचे निर्मिक हायेत प्रा. डॉ. सुनिल पखाले.

संग्रहाचं मुखपृष्ठ पाहूनच मी हपचप झालो. बंडीचं एक तुटलेलं चाक. मोळमाळ होयेल आरे पुठ्ठे बुदला, अंगार लागल्याच्यानं धुमसत हायेत अंदरून. या ठिकानी मले कवि पद्मश्री नारायण सुर्वे यायच्या पुस्तकायचे जे मुखपृष्ठ हायेत त्येच्यावर यकानं पीएचडी केल्याची, जेष्ठ साहित्यिक मा.उत्तम कांबळे सरानी यका व्याख्यानात सांगलेली गोस्ट आठोली.

डॉ.वासुदेव मुलाटे सर 'कास्तकारायन'च्या प्रस्तावनेत सांगतात कां ...यकोनीश्शे पंच्याहत्तरच्या बाद दलीत साहित्य चळवळीतून अभिव्यक्तीच्या साहित्यिक चौकटा मोळून टाकत आत्मजानीवेचा जोरदार उद्रेक पुळे ग्रामीन साहित्यातयी तेवळ्याच ताकतीनं उजागर होत गेला. कास्तकाराच्या शिकेलसवरेल पोरायीच्या लिखानातून कथा कविता कादंबऱ्याच्या रुपानं धग वाळतच रायली. आपलं दुखनं खुपनं आपल्याच बोलितून मांडलं त् ते अजूक मुरत जाते. आपल्या वऱ्हाडी बोलीत लिखान करनारे प्रा. डॉ. सुनिल पखाले सर त्यातलेच यक ..! कास्तकाराचं जगनं काहून मातीमोल व्हावं? जगनं महाग अन् मरन यवळ सस्त कसं काय व्हावं? अवघ्या जगाले घास भरोनारा, सोता काहून उपाशी राह्यत असंन? अश्या परीस्तीतीत आपून काई अधार दिऊ शकतो काय? हा त्यायीच्या चिंतनाचा विशय. त्याच बरोबरीनं आपुनई येच्यातलाच एक हावो, अश्या आपलेपनाच्या भावनेतुन हे लिखान जल्माले आलं.

कवी गझलकार प्रा. सिध्दार्थ भगत सर, कास्तकारायनाच्या पाठराखनीत म्हनतात का, " माती ! तीच्यावर संस्कार केले का मोती पीकोते. पन दगा देला कां जीनगानीची माती होते. आमचा कास्तकार हाळाची काळी करून मातीवर संस्कार कराले मांग सरत नाई. मातर हात टाकतो तीथं त्याच्या हातात माती बगर काईच लागत नाई! " अश्या ताकतीची काव्यात्मक पाठराखन यखांद्या संग्रहाले भेटावं, हायी काई योगायोग नाईच. हे अस्सलता हाये कास्तकारायची. अंदरुन उपजेल लिखानाची.

कास्तकारायनची सुरवातच " कोंबातून उगोनाऱ्या बळी राज्यास समर्पित " अशी जगाच्या अन्नदात्याले समर्पित भावानेतून झाल्यानं, पुळे भावनीक जिव्हाळ्याची वल पानापीच्छे गहरी होतं जाते.भीळत जाते. सलत जाते. मनाले दुखवत जाते. टाके उसवत जाते.
कोनतायी मोठेपनाचा आव ना आनता, आपल्या मनोगतात पखाले सर सांगतात, का उभ्या जगाले पोसनारा पोशींदा, मातीत रघताचं पानी करून अलम दुनियेच्या मुखात घास भरोनारा अन्नदाता, आज भुकमरीनं मरत हाये. मातीले माय मानून जीव लावनाऱ्या लेकरायच्या हलाकीवर लिवायची पायी साहित्यावर यावी ही त् नामुस्कीचीच गोठ. आपली सांस्कृतिक जान खतम झाल्याचं लक्षन. ते खरयी हायेच म्हना, स्वातंत्र्याच्या बाद पयल्या पंचवार्सीक योजनेत इकासाचं जे मॉडेल ठरोन्यात आलं होतं, तेई वावराच्या भरोश्यावरच होतं. केवळा इस्वास भरोसा असीन या मातीवर. मातीत राबनाऱ्या लेकरायीच्या मनगटायवर.पन मंग असं काय झालं कां, आजघळीले हे मातीचे लेकरं अधार तुटल्यानं, ज्या मातीनं जगोलं त्याच मातीवर उभ्या झाळाले लाखमोलाचे जीव टांगून द्यालेई मांगपुळ पाहत नाई. काई इलाजच नसीन काय लेक! त्यायीच्या जीनगानीच्या होयेल चींध्यायले टाके माराचा? त्यायीच्या मुक्तीचे कवाळं भैरवकवच लाऊन कशी काय कळेकोट बंद केली असंन भारतासारक्या कृषिप्रधान देशात.? कोन जिम्मेदार असंन या परिस्तितीले. दुख डोयानं पावल्या जात नाई. मातीत पीकत नाई. अस्मान सुसु देत नाई. दलाल चईन पळू देत नाई. पीकलं त् भाव नाई. भाव हाये त् वक्तावर कामी पळत नाई. निऱ्हानाम वावरामांग लागलेल्या या अवदशेनं अशी कोनती करनी केली असीन कां निंगाला तो दिवस बेईमान हुन नुस्ता जीवाले खाले उठून रायला. खोल दरीत धळाळ उळ्या माराले लाऊन रायला. मनात साचून साचून तरमा कदलोक ठुवावं? आखीर यक जीतंजागतं मन त् माननार नाईच ना ! बस्स याच आंतरीक उर्मीतून, तुह्य दुख ते माह्य दुक अश्या मानवतावादी चिंतनातून उपजेल या कविता..यका टायमाले कुमकर्नावानी झोपी जायेल व्यवस्थेवर रट्टे हानते त् दुसर्या बाजूनं कास्तकारात जगन्याचं भान पेरून, त्याच्या कोरळवाहू जगन्यात बागायती आस जागवासाठी "शेतकरी मनोबलवृध्दी अभियान" " पानी फाउंडेशन " अश्या सामाजिक बांधिलकी जागोनाऱ्या कार्यक्रमातून गावोगावी कास्तकारायनाचे काव्यवाचनयी सुरु असते. म्हंज्ये कास्तकारायन नुसतं कागदावर लोयत बसत नाई. लिहून मोकय होत नाई त् लोकांतयी तेवळ्याच
फुरताईनं पोचासाठी कस्ट घेत हायेत.

मराठी साहित्यात दिर्घ कवितेची परंपरा हायेच पन वऱ्हाडी बोलीत असं पाहून जीवाले गमलं. या संग्रहाची खाशीयत म्हंज्ये, कवितेले नंबर नाई ,कोनतयी शिर्षक नाई , कोनतायी आयाम नाई , सारं कसं खुल्या अभायाखाली पुस्तकरुपी वावरात रनभन पसरेल माहागीमोलाचं अक्षरअगाईत. कोनतयी पान उघळा, कुठूनयी सुरवात करा, शुरूवात का कोई अंत नही म्हना का मंग आरंभ ही प्रचंड है म्हना. सारखच. यकसस्ट पानाचा हा लेखाजोखा कास्तकार कास्तकारीची गाथाच हाये.

सुरवातीलेच " कास्तकार दादा आईक आता ! सांगतो तुले सल्ला ! कितीक दिवस भरसीन राज्या सावकाराचा गल्ला !" अशी मयेनं खांद्यावर हात ठीऊन आपल्या दोस्ताले, भावाले ..अन् समस्त कास्तकारायीले खबरदारीचा सल्ला दीऊन....पुळे भयान वास्तवाची जानीव करून देतानी "लुचाडायची दुनिया सारी सत्याले न्याय नाई ! दिवस तुवा उगवन थांब करू नोको घाई " अशी पानापानावर कास्तकाराच्या सुकाची. दुखाची.सपनाची.संघर्षाची. अस्मानी सुलतानी धोक्याची.लुबाळल्याची.रट्टे हानाची. मांडनी आंतरीक जिव्हाळ्यातून आपल्याले वाचाले भेटते.

आजचं माह्य जगनं त्या वावरानच पोसलं हाये.माह्ये गनगोत दोस्त शेजारीपाजारी त्यायीची तं सारी दारोमदार आजई वावराच्या भरोश्यावरच हाये. गावातून फोन आल्यावर 'सादलं गळ्या पेरनं', 'बसला राज्या बजेट' 'औंदा तं काई खरं दीसून नाई रायल पान्याचं'. 'बोगस बीयान्यानं दुबार पेरनी माथी मारलीच शेवटी'. साऱ्या सुखा दुखाची सुरवारत वावरापासून अन् शेवटयी वावरावरच होते......मंग असं काही वाचलं का मनाची डांग हालतेच...!

रवींद्र अंबादास दळवी, नाशिक
7038669542

  • Log in or register to post comments
  • 3 views

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 29 *
Who's new नवीन सदस्य
  • Gauspasha Shaikh
  • anil Sanap
  • Dhirajkumar Ra…
  • 9921399797
  • डॉ. मीरा पंडित

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा
    1 hour 28 minutes ago
  • आपण चुकीच्या लिंकवर पोस्ट…
    6 hours 7 minutes ago
  • धन्यवाद
    3 days 8 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    3 days 8 hours ago
  • आता तयार व्हावे
    3 days 9 hours ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ