
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कुणब्याच पोर
गावाकड शेतात बाप राबराब राबतय
शेह रात पोरग नवा बिअर बर गाठतय//ध्रु//
दुबार पेर केली न्हाई उरल बियाण
आतातरी पाठव की बाबा चार आण
गावाकड पैसा द्याया ह्याचा खिसा आटतय
शेहरात पोरग नवा बिअरबार गाठतय//१//
औंदाच्या हंगामात बरकत न्हाई आली
माय तूही पाटलाघरी निंदाया गेली
मायला लुगडं फाटक बायकोला बनारशी घायच घाटतय
शेहरात पोरग नवा बिअरबार गाठतय//२//
गावाकड बरसादीन ढासलय पार घर
शेहरात ह्यो चढवतोय ईमला ईमल्यावर
कुणब्याच्या जाण्यान हेचा बंगला बाटतय
शेहरात पोरग नवा बिअरबार गाठतय//३//
बिमार होऊनशान बाप खाटल्यावर पडला
ह्या वखताला बाबा लय टायमावर आला
अंगुठा तेचा घेण्यासाठी पाय त्याचे चाटतय
शेहरात पोरग नवा बिअरबार गाठतय//४//
किशोर देशमुख,परभणी