विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२५ : महत्वाचे निवेदन
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीदिनानिमित्त दरवर्षी ३ सप्टेंबरला आपण विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा आयोजित करत असतो परंतु संकेतस्थळाचे अपग्रेडेशन रखडले असल्याने यावर्षी अजून लेखनस्पर्धा आयोजित करता आलेली नाही.
बळीराजा डॉट कॉम संकेतस्थळ ड्रुपल (Drupal) या ओपन-सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमवर काम करत असते परंतु सध्या वापरात असलेले ड्रुपल 7 हे व्हर्जन कालबाह्य झालेले असून जानेवारी 2025 पासून सपोर्ट बंद झालेला आहे. त्यामुळे संकेतस्थळ ड्रुपल 7 वरून ड्रुपल 11 वर अपग्रेड करणे आवश्यक आहे.
बळीराजा डॉट कॉमचा आवाका लक्षात घेता ड्रुपल 7 वरून ड्रुपल 11 वर अपग्रेड करायला दररोज काम केल्यास कमीत कमी एक महिना एवढा दीर्घ कालावधी लागेल, अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत तेवढा वेळ उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे आणि बाहेरून काम करून घ्यायचे ठरवले तर 70 - 80 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च येण्याची शक्यता असल्याने व तशी आपल्याकडे काहीही आर्थिक तरतूद नसल्याने तोही पर्याय वापरता येत नाही.
यातून लवकरच मार्ग निघेल अशी आशा आहे. संकेतस्थळाचे अपग्रेडेशन करून झाले की लवकरच विश्वस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित केली जाईल.
धन्यवाद!
