बळीराजा़ डॉट कॉमवर आपले सहर्ष स्वागत आहे.
बळीराजा़ डॉट कॉम
अनेक दिवसापासूनची एक इच्छा होती की, कोट्यवधी शेतकरी असलेल्या या विशालप्राय देशात किमान काही हजार शेतकरी मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन शेती या विषयावर त्यांनी आपसात चर्चा केली पाहिजे. आपल्या सुखदु:खात एकमेकाला समरस केले पाहिजे. शेतीत आयुष्य व्यतीत केल्यानंतर आलेल्या अनुभवांची आपसात देवाण-घेवाण केली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान अवगत करताना आणि त्याचा आपल्या शेतीत वापर करताना येणार्या अडचणी सोडवून घेण्यासाठी आपसात विचारविनिमय झाला पाहिजे.
शेतीचे यतार्थ चित्रण करणारे आणि परिवर्तनाला भाग पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण आपण म्हणतो की आम्ही मात्र लिहिणार नाही. ते इतरांनी लिहिले पाहिजे. आमचे आयुष्य जगलो आम्ही, आमच्या हालअपेष्टा भोगल्या आम्ही, आंदोलनात उतरलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, लाठ्यागोळ्या झेलल्या आम्ही आणि आम्ही म्हणतो की आम्ही लिहिणार नाही. ते कुणीतरी लिहावे. हे कसे शक्य आहे? हे कदापि शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मिती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढ्या प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत. आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. अस्सल आणि अभिजात लेखन करायला लेखनशैलीची गरज भासत नाही. बोबडेबोल जरी अस्सल आणि अभिजात असेल तर त्यात जिवंतपणा असतो व तो जिवंतपणाच त्या लेखनाला परिणामकारकता प्रदान करतो. लेखन करणे ही एक कला असते, हे मान्य; पण लेखनात कलाकौशल्य वगैरे वापरल्याने ते लेखन कलाकृतीकडे झुकते आणि मग ती कलाकृती वास्तविकतेपासून फारकत घेण्याची दाट शक्यता असते. कला ही कला असते आणि वास्तव हे वास्तव. त्यामुळे फारसा विचार करायची गरज नाही. जसे लिहिता येईल तसे आणि जसे जमेल तसे लिहायचा प्रयत्न शेतकर्यांनी करायलाच हवा.

उत्तम !!
डॉ.कैलास गायकवाड
उपेक्षितांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. :)
धन्यवाद डॉक्टर साहेब.
admin
आपण पहिले सदस्य आणि पहिले प्रतिसादक ठरले आहे.
बळीराजा डॉट कॉमतर्फे आपले खूप खूप अभिनंदन. :)
उत्तम प्रकल्प!
प्रमोद देव
मुटेसाहेब, आपला हा प्रकल्प उत्तमच आहे हे नि:संशय!
हे संकेतस्थळ बहरो,प्रसिद्ध पावो आणि बळीराजाच्या उपयोगी पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो. :)
धन्यवाद देव साहेब.
admin
या कामी आपले मोलाचे सहकार्य लाभेल याची आम्हास खात्री आहे. :)
अतिशय उत्तम प्रकल्प अभिनंदन!
राजे
अतिशय उत्तम प्रकल्प :)
अभिनंदन!
धन्यवाद राजे.
admin
धन्यवाद राजे. :)
अभिनंदन...
योगेश मुंढे
मुटे काका,
अतिशय उत्तम प्रकल्प. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा . :) :)
धन्यवाद योगेश. पुढील वाटचालीत
admin
धन्यवाद योगेश.
पुढील वाटचालीत तुमचापण हातभार लागावा, हि विनंती. :)
अभिनंदन आणि शुभेच्छा !
स्वामी संकेतानंद
शेतकर्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!
हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल हा माझा ठाम विश्वास आहे !
शुभेच्छा !!
मुटेकाका अतिशय छान आहे
पिंगू
मुटेकाका अतिशय छान आहे प्रकल्प. शेतकरी बंधूंना इथे मार्गदर्शन लाभो हीच सदिच्छा.
- पिंगू
अभिनंदन.......!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बळीराजा संस्थळ उत्तम बनले आहे. बळीराजा संस्थळासाठी हार्दिक शुभेच्छा.........!!!!
-दिलीप बिरुटे
स्वागत
admin
स्वामी संकेतानंदजी, पिंगूजी, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे. :)
एक चांगला उपक्रम
प्रशांत कवळे
एक चांगला उपक्रम हाती घेतलाय आपण!
हार्दिक शुभेच्छा!
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत
admin
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे प्रशांतजी.
या उपक्रमाचे यशापयश मात्र आपणा सर्वांवर अवलंबून आहें. :)
अभिनंदन आणि शुभेच्छा...
प्रसन्न केसकर
अश्या एका व्यासपीठाची खरेच गरज होती. मुठेसाहेबांनी ती जाणुन पाऊले उचलली यासाठी अभिनंदन आणि या प्रकल्पाला घवघवीत यश मिळावे, तो सुरु करण्यामागील सर्व उद्दिष्टांची पुर्ती व्हावी अशी शुभेच्छा.
प्रसन्न केसकर
मुटेकाका हार्दिक अभिनंदन.
बाळासाहेब घुले
मुटेकाका हार्दिक अभिनंदन.
प्रसन्नजी, बाळासाहेब बळीराजा
admin
प्रसन्नजी, बाळासाहेब
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे. :)
अभिनंदन
गिरधरपाटील
एक चांगला प्रयत्न.
स्वागत आहे
admin
श्री गिरधर पाटील साहेब,
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे.
आपल्या या क्षेत्रातील जेष्ठतेचा नक्कीच फायदा होईल, अशी खात्री आहे. :)
अभिनन्दन
महादेव कापुसकरी
मुटे साहेब याना सप्रेम नमस्कार.
आपला हा उपक्रम अतिशय चान्गला असुन सामान्य शेतकर्याला आपन हे हक्काचे व्यासपीथ मिलवुन दिले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनन्दन सर...