Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



Ravindra Kamthe

Ravindra Kamthe's picture
Wall Post
Ravindra Kamthe updates its status
October 3, 2019 at 03:03pm
|| श्री || दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१९ विषय : विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०१९ : वर्ष ६ वे* पद्यलेखन स्पर्धा-२०१९ : विभाग* : अ) पद्यकविता प्रती, श्री. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ नमस्कार, माझ्यासारख्या शहरी माणसाच्या नजरेतून मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या ह्या विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०१९ : वर्ष ६ वे* पद्यलेखन स्पर्धा-२०१९ : विभाग* : अ) पद्यकविता पाठवत आहे. || विळखा कर्जाचा || आजकाल ह्या पावसाचं काही खरं नाही त्याच्यावर विसंबून काही राहता येत नाही || कधी असते अवकाळी तर कधी कधी दुष्काळी किती पेरावं कधी पेरावं प्रश्नच पडतात मायंदळी || पेरलं तर उगवलं ह्याची खात्री नसते काही उगवलं तर भीती सतत किड्याकीटकांची राही || एखादं बारीला येतं की पिकं हो मुबलक येरवाळी बाजारभावानं बळीराजाची तोंड मात्र पडतात काळी || विळखा कर्जाचा जातो आवळला बळीराजाच्या मानेला लुटतात सरकार व सावकार दोन्ही हातांनी बळीराजाला || जगतो बिचारा आशेवर मिळेल योग्य दाम त्याच्या पिकाला फिकीर कुठे असते हो त्याच्या ह्या व्यथांची मुर्दाड सरकारला || असतात की हो त्याची पण संसाराची स्वप्न हलकी फुलकी दोनाचे चार हात करून धाडावे लाडक्या लेकीला सुखासुखी || नसतो अधिकार बळीराजाला ही असली सुखी स्वप्न पाहण्याचा रोष असतो त्याच्यावर ज्यांच्यासाठी तो खपतो त्याच शहरी माणसांचा || बेजार होतो लाचार होतो परिस्थती पुढे तो माघारही घेतो कंटाळून शेवटी पत्करून शरणागती गळ्याला फास आवळतो || तो जातो उघड्यावर टाकुनी लेकरंबाळ, करुनी विधवा बायकोला अजुन एक मेला, लटकून, नोंद होते त्याची सरकारी दप्तराला || नाही संपत ही शोकांतिका अशी ह्या कर्जाच्या विळख्याची आज त्याची पाळी होती, तर उद्या असेन अजून कुणाची || आपला स्नेहांकित, रविंद्र कामठे

परिचय

सदस्याचे पूर्ण नाव
Ravindra Kamthe
जन्मतारीख
30/10/2014
लिंग
पुरूष

कालावधी

खरडवही
खरडवहीतील नोंदी पाहा
सदस्य कालावधी
9 वर्षे 9 months