Loading...
Skip to main navigation Skip to footer
Home
  • Create new account
  • Reset your password

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.

कुबेराचं मोल : प्रवेशिका

Profile picture for user विलास वाळके .
By विलास वाळके . | 10:29 PM IST, Sat September 05, 2015
पद्यकविता

1.कुबेराचं मोल
पाभारीच्या संगतीनं
झाली स्वपनांची पेर
काकरीच्या रेघमधी
उद्या फुलेलं शिवार

गर्भ बीजाच्या अंतरी
जीव तयात फुंकला
बाळ कधीचा भुकेला
पान्हा आभाळी फुटला

खरपते माय माझी
तन खुरप्यात येई
काळ्या आईचा पदर
नीट सावरुन घेई

मोट चालते सैराट
बारं टाचतं साऱ्याला
गंध कोण्या शिवाराचा
पेच अजूनी वाऱ्याला

काळ्या आईची ही माया
काळजात खोलखोल
ओंजळीला लेकराच्या
येई कुबेराचं मोल!

2. सांगून गेले बाबा

सांगून गेले बाबा
जगी गाथा जगण्याची,
' महारोगी कुणी ना येथे
ही सेवा महाप्रभूंची'

घनदाट दाटला होता
काळोख मनाच्या भवती
व्यथा प्रथेच्या आणिक
काजळी तयाची होती

लक्तरे अशी शरिराची
मनेही झडली होती
पाहुनी मास सडलेले
धरणीही रडली होती

बहुवाट ' विकासाची'
तूच दाविली बाबा
तव 'प्रकाश' उजळील आता
नव्या युगाचा गाभा!

3. पेरणी

काकरीच्या रेघमधी
गुंतला ग जीव
उगवत्या मनालाही
फुटल्याती पेव

पाभारीच्या लगोलग
बाई मोघण्याचा साज
सात जलमाचं फेरं
मन घालतया माझं

सर्जा राजाच्या नावाचा
डंका रानोमाळ होई
आसुडाच्या कौतुकाचं
हसु जुपनीला येई

तिफनीच्या कुंचल्यानी
नक्षी काढली भुईला
रंग येईल ग नवा
धरतीच्या पदराला

मनचिया मळ्यामधी
झाली स्वपनांची पेर
हिरव्याच्या मोडावानी
स्वप्न उगवंल सारं.

4. हिरवं सपान

उन्हं कलली ग सये
जरा इसाव्याला जावू
कांदा-भाकरीच्यामधी
रुप इटुबाचं पाहू

दिल उगवला तव्हा
काम अगतीन केलं
पात उधळली बाकी
दल खुटानाला आलं

खुरप्याची जीब बाई
ढुशी मारती रानाला
असा फुटलं ग पान्हा
काळ्या आईच्या मनाला

पाटाच्या पाण्यामधी
काय तुला ग दिसतं
शालू हिरवा लेवूनी
हिरवं सपान फिरतं

तिसऱ्या ग पहराला
मोट रायाची सुटंल
किती वारलंया काम
त्याच्या डोळ्यात दिसंल

दिस जाईल कलून
ओढ लागंल घराची
असती ग माया मोठी
पाखराला घरट्याची.

लेखनाचा विषय

admin

Wednesday, September 9, 2015 - 11:49
Permalink
New

लेखनाचा विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5440 views

User account menu

User registration guidelines

बळीराजा डॉट कॉमचे सदस्यत्व घेण्यासाठी
सदस्यनाम:- म्हणून स्वत:चे नाव किंवा टोपणनाव वापरावे.
मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहिण्यासाठी बाजूच्या विजेटमधून भाषेची निवड करा.

विरोप पत्ता: आपला Email लिहावा.
तात्पुरते संकेताक्षर आणि इतर सुचना तुम्हाला तुमच्या याच विरोपा(Email)वर पाठवण्यात येतील.हा विरोप पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल.
दिलेले संकेताक्षर वापरून बळीराजा डॉट कॉमवर (सदस्य प्रवेश) लॉगीन करावे.
त्यानंतर लगेच आपले खाते संपादन करून संकेताक्षर बदलून घ्यावे.
संकेताक्षर किमान आठ अंकी/अक्षरी असावा.

बळीराजा डॉट कॉमवर आपणास वाचन आणि लेखनास शुभेच्छा....!

Who's new नवीन सदस्य

  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Who's online हजर पाहुणे

There are currently 1 users online.
  • admin

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ