✍️@ संदीप, १४/०७/२०१९
काळीज चिरणाऱ्या वेदनांचा, "वेद" करता आला पाहिजे
सोंगाड्या दुनियेत, आपल- परक भेद करता आला पाहिजे.
साठवतो प्रत्येकच जण, काही न काही, काळजात आपल्या
हातातून निसटणारा तो क्षण मात्र कैद करता आला पाहिजे.
विषयाचं काय ते गावले असते की किती तरी दगडाखाली
शोधतो असा मथळा ज्याचा परिच्छेद करता आला पाहिजे.
सगळ्याच गोष्टींना होकार, तुझं अस काहीच मत नाही का?
न पटणाऱ्या गोष्टींमध्ये तुला, मतभेद करता आला पाहिजे.
ते जे बोलतील ते खरंच असेल, अस मुळी नसतंच "संदीप"
शब्द अन् शब्द फोडून तुला ,अर्थ भेद करता आला पाहिजे.
