पहाडी. दीपचंदि
संदीप, ११/०३/२०२३
एक दिवस नक्की येतिल, माझी कर्म मलाच विचारायला, त्यांना उत्तर काय देऊ?
जगण्याच्या धुंदीत विसरत गेलोय सारी सुख दुख त्यांचा हिशोब तरी मी काय ठेवू?
अथांग सागर, अनंत पोकळी, हृदयातल दुःख, काय म्हणून काय मोजायला घेऊ?
यायचं का तुला?सोबत माझ्या दुःख भोगायला, चल तर मग आपण सोबतच जाऊ.
आयुष्यभर नुसतच आशेने पाहत राहिलो नशिबाला, आता सरते वेळी दोष काय देऊ?
तुझेच प्रयत्न अपुरे पडले देवा मला घडवताना, तूच सांग मी तरी कुठवर समजावून घेऊ?
सगळ्यांनीच फिरवली पाठ गरजेच्या वेळी, सांग कुणाच्या तोंडा कडे बर आशेनं पाहू?
माझं मलाच झालं जीवाच ओझ, दुनियाच्या अपेक्षांना मी कुठवर खांद्यावर वाहून नेऊ?
बुडत चालली या जीवनाची आशा, ह्या मावळतीच्या सूर्या संगे मग मी तरी कुठं जाऊ?
निर्भिड केलं मनाला,अन् समजावून ही सांगितलं, तू चालत रहा "जिथं उजाडलं तिथं पाहू"
