लेखनस्पर्धा
44
9860818267
nandagawalidhirajkumar@gmail.com
वानाडोंगरी
नागपूर
नागपूर
शेतकरी कविसंमेलन
कवितेचे शीर्षक : बाप शेतकरी माहया
बाप शेतकरी माहया
साऱ्या जगाचा पोशिंदा,
चाले अनवाणी पायी
नाही कोणाचा तो मिंदा,
बाप शेतकरी माहया
करी मातीची चाकरी ,
घाम गाळे शेतामदी
तवा मीळे रे भाकरी,
बाप शेतकरी माहया
बोले कष्टाची रे भाषा ,
त्याच्या थकल्या डोळ्यात
मला दिसते रे आशा,
बाप शेतकरी माहया
वाट पावसाची पाई,
जमिनीतल्या बियाले
सुटे उगवाची घाई,
बाप शेतकरी माहया
फोडे कर्जात कपाळ ,
चुक चुकवूनी पार
रडे वरच आभाळ ,
बाप शेतकरी माहया
यंदा दुष्काळ आला,
बीज अंकुरली थोडे
जीव घुटमळ झाला,
बाप शेतकरी माहया
आता जीद्दीले पेटला,
वैतागूनी नापीकेले त्यान
झोका झाडाला घेतला ,
बाप शेतकरी माहया
तु नको रे झुलू रे,
आपण हिमतीने पुन्हा
वावर नव्याने पेरू रे,
©® धीरजकुमार नंदागवळी
पत्ता :- प्लॉट नंबर 106 सावंगा निवास,
श्री गजानन कॉलनी वानाडोंगरी ,संगमरोड
ता. हिंगणा जि.नागपूर पिन कोड 441110
फोन नंबर - 9860818267
बाप शेतकरी माहया
साऱ्या जगाचा पोशिंदा,
चाले अनवाणी पायी
नाही कोणाचा तो मिंदा,
बाप शेतकरी माहया
करी मातीची चाकरी ,
घाम गाळे शेतामदी
तवा मीळे रे भाकरी,
बाप शेतकरी माहया
बोले कष्टाची रे भाषा ,
त्याच्या थकल्या डोळ्यात
मला दिसते रे आशा,
बाप शेतकरी माहया
वाट पावसाची पाई,
जमिनीतल्या बियाले
सुटे उगवाची घाई,
बाप शेतकरी माहया
फोडे कर्जात कपाळ ,
चुक चुकवूनी पार
रडे वरच आभाळ ,
बाप शेतकरी माहया
यंदा दुष्काळ आला,
बीज अंकुरली थोडे
जीव घुटमळ झाला,
बाप शेतकरी माहया
आता जीद्दीले पेटला,
वैतागूनी नापीकेले त्यान
झोका झाडाला घेतला ,
बाप शेतकरी माहया
तु नको रे झुलू रे,
आपण हिमतीने पुन्हा
वावर नव्याने पेरू रे,
©® धीरजकुमार नंदागवळी
पत्ता :- प्लॉट नंबर 106 सावंगा निवास,
श्री गजानन कॉलनी वानाडोंगरी ,संगमरोड
ता. हिंगणा जि.नागपूर पिन कोड 441110
फोन नंबर - 9860818267
सार्वजनिक
