Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

शेतकरी साहित्य संमेलनामुळे आम्ही-बि-घडलो

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:50 PM IST, Tue February 17, 2026
प्रेरक लेख
शेती आणि शेतकरी

शेतकरी साहित्य संमेलनामुळे आम्ही-बि-घडलो 




आदरणीय,
           श्री गंगाधर भाऊ, नमस्कार.             

मी काही मोठा साहित्यिक नाही, पण शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून जे काही अनुभव मला आले. ते मी कविता व लेखाच्या माध्यमातून व्यक्त करीत गेलो.शेतकरी साहित्य चळवळीमुळे मला हक्काचे  व्यासपीठ मिळाले. व त्याच अनुभवाच्या माध्यमातून मी वरुड येथे तालुकास्तरीय शेतकरी कवी संमेलने सतत चार वर्ष घेऊ शकलो. शेतकरी साहित्य संमेलन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं खुलं व्यासपीठ आहे, त्याचप्रमाणे साहित्यिकांना कार्यशाळा सुद्धा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा होण्यासाठी पुढेही  साहित्य चळवळ सतत  चालण्याची गरज आहे.
--- दिलीप भोयर, धनोडी.
ता. वरुड, जी. अमरावती

==============

आजपर्यंत झालेल्या तेरा शेतकरी साहित्य संमेलनांपैकी सात ते आठ संमेलनात एक कवी म्हणून मी हजेरी लावली आहे .  लहानपणापासूनच  शेती मातीशी नाळ जुळलेली आहे . शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने गाव सोडले आणि त्यानंतर गावाची आणि वावराची आठवण चैन पडू देत नव्हती. त्या आठवणींचीच कविता झाली. 
    गडचिरोली येथे पहिल्यांदा शेतकरी संमेलनात कविता सादर केली. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत आपण व्यासपीठावर कविता सादर करू शकतो,ही जाणीवच एक प्रेरणा होती. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भरलेल्या शेतकरी साहित्य संमेलनात अनेक जेष्ठ आणि विद्वान साहित्यिकांना ऐकण्याची संधी मिळाली. आपण काय आणि कसे लिहावे याची दिशा मिळाली. माझ्या शेतीमातीवर लिहिलेल्या कविता,कथा अनेक मासिकांतून, दिवाळी अंकातून प्रकाशित होऊ लागल्या. दाद मिळवू लागल्या. गर गर भोवरा नावाचा एक बाल काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्या बालकवितेत सुद्धा बहुतांशाने शेतीमातीचेच चित्र उमटले आहे. 
आगामी भोवरा खुरपं आणि माऊस हा काव्यसंग्रह याच आशयाची कविता घेऊन लवकरच प्रकाशित होईल. 
   शेतकरी साहित्य संमेलनात मिळालेल्या प्रेरणेचे, मार्गदर्शनाचे आणि प्रोत्साहनाचे हे फलित आहे,असे मला नम्रपणे कबूल करावेच लागेल.
 
*प्रदीप देशमुख, चंद्रपूर*
 
कवितेच्या ओळी 
 
कष्ट करून जे थकले शिणले
चुंबून घेईन त्या हातांंना
अविरत चालून जे दमलेले
लाविन माथा त्या चरणांना
 
सर्वांगावर घामाच्या धारा
अन् ओठांवर हिरवी गाणी
जो जगताचे करतो पोषण
नतमस्तक मी तशा ठिकाणी
 
 
प्रदीप देशमुख, चंद्रपूर 
=============
 
'शेती मधील व्यथांचे अभ्यासुनी सर्व मार्ग 
शेती साक्षर पिढीचा भरवीला नवा वर्ग'
 
मराठी शेतकरी साहित्य चळवळ, अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या आयोजनाद्वारे,गेल्या एक तपापासून साहित्य विश्वात, शेती मातीच्या वस्तूनिष्ठ जाणीवांची पेरणी करीत आलेली आहे. या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हनूण माझा झालेला साहित्यिक प्रवास, मला माझ्या पुरता प्रगल्भ करीत गेला.शेती व्यवसायांचा कणा असलेला, शेतीमधील अर्थ विषयक विचार, प्रथम प्राधान्याने घडवून आणलेल्या विविध साहित्यिक चर्चा मधून खऱ्या अर्थाने समजून घेता आला. ही मोठी उपलब्धी मानतो मी.



रविंद्र दळवी, नाशिक 

==============


शेतकरी साहित्य चळवळीच्या उदयामुळे मी लिहिता झाली कारण शेतकऱ्यांच्या जीवनात कायम दुःख, गरीबी सोबतीला असते. कधी कोणत्या वर्षी  शेती पिकते आणि कोणत्या वर्षी उत्पन्न सुद्धा कमी होते.
कधी कधी तर  शेतीत लावलेला खर्चही निघत नाही 
 शेवटी कपाळावर हात ठेवून आपल्याच नशिबाला  दोष देतो अशी शेतकऱ्यांची स्थिती असते. त्याच्या कष्टांचे दाम त्याला  मिळत नाही. ऊन पावसात जीवाची पर्वा न करता रात्रंदिन शेतीत  राबणाऱ्या शेतकऱ्यांचे कष्ट शासन,शहरी,  धनदांडग्या जनतेसमोर आले पाहिजे. 
शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो भाव मिळावा म्हणून लेखणीच्या माध्यमातून त्यांचे कष्ट समाजासमोर आले पाहिजे आणि लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की शेतकरी सुखी तर जनता सुखी पण, प्रत्यक्षात आपल्याला जनता सुखी दिसते आणि शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला किंमत नसल्यामुळे शेतकरी उदासीन, दुःखी झालेला  असून सुद्धा पुन्हा पुढच्या वर्षी नव्या जोमाने  धरणीमाय मातीत बियाण्याची पेरणी करतो.
 
 मातीचे कष्ट उपसल्याशिवाय 
 धरणी माय देत नाही पिक,
 फक्त हवे कष्टाचे मोल 
 नको त्याला  नुसतीच भीक.
 
सौ सुरेखा बोरकर 
 नागपूर

=============


शेतकरी साहित्य संमेलन एक अभिनव उपक्रम आणि चळवळ आहे. शेती विषयक प्रात्यक्षिक ज्ञानातून व अनुभवातून तयार झालेली आणि ध्येय, उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एका विशिष्ट दिशेने मार्गक्रमण करणारी ही  एक चळवळ आहे. शेती आणि शेतकरी यांच्या वास्तविक दुःख- सुख मांडण्याचे हक्काचे उत्तम व्यासपीठ म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन होय.

 
एक लिहिता झालेला

सतीश मानकर, आर्वी छोटी, वर्धा 

===========

साहित्यिक म्हणून माझा आवडता साहित्यिक विषय शेतीमाती आणि गावगाडा आणि या विषयाला योग्य न्याय देणारं साहित्य संमेलन म्हटलं तर "अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन"  याचे आयोजक मान. कार्याध्यक्ष श्री गंगाधर जी मुटे सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी कार्यप्रणाली यांनी मिळून मागील दहा एकरा  वर्षापासून चालवलेली ही शेतकरी चळवळच म्हणावे लागेल. अतिशय वैचारिकतेच्या पातळीवर असणारी साहित्यिक चळवळ आहे या चळवळीतून माझ्या आवडत्या विषयाला अतिशय योग्य न्याय मिळाला ही मी ठामपणे सांगतो. 
    "शेतकरी हा जगाचा पोशिंदा पण आजच्या स्थितीला यांच्यास जगण्याचा झाला वांदा" अशा या ओळीप्रमाणे कुठेतरी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांवर व्यक्त होण्याला थोड्या प्रमाणात का होईना त्याचे उत्तर शोधण्याचा या संमेलनातून व्यक्त होताना जो मान मिळतो तो मान कुठेतरी उपयुक्त आल्यासारखं वाटतं आपलं साहित्य कुठेतरी उपयोगी आल्यासारखे वाटतं. या अतिशय उपयुक्त उपक्रमासोबत नेहमीच जुळून राहावं आणि आपली साहित्य सेवा, शेतकरी साहित्य संमेलनासाठी कामी यावी या अपेक्षेने मी मान्यवर आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो ....
 
संपच झाला यदा कदाचित दाण्याचा 
या धर्तीवर अकाल पडेल खाण्याचा 
 
शेतकऱ्यांचे प्रश्नच मांडत नसती तर 
काय फायदा गझला कविता गाण्याचा
 
 सुनील बावणे - निल
वायगांव (तु.)भद्रावती

============



नमस्कार सर, 

आपले मानावे तितके धन्यवाद कमी आहेत कारण की आपण जो उपक्रम हाती घेतला शेतकरी आणि साहित्य संमेलन हे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने बोलता वाचता लिहिता करता यावे ही आपली मनापासूनची धडपड फार मोलाची आहे मी व माझी फॅमिली सुरुवातीपासूनच संमेलनामध्ये भाग घेत आलेलो आहे पहिले साहित्य संमेलन वर्धा येथे झाल्यापासून अपवाद एक-दोन साहित्य संमेलन वगळता सर्व साहित्य संमेलनाला हजर राहिलो आहे आणि माझ्या मनात या साहित्य संमेलनामुळे शेतकऱ्या विषयी काहीतरी लिहावे अशी भावना तयार झाली आहे याच श्रेय अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेल ला जाते आणि येणारे साहित्य संमेलन दाभेमोहन जिल्हा सातारा ह्या साहित्यसमानाला येणार आहे सध्या बी लेख लिहिला नाही परंतु येणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये माझा लेख आपल्याला पाठवला जाईल धन्यवाद 
 
आपला 
रमेश खांडेभराड, जालना

============

ही त्यांचीच खरी प्रेरणा..
1983-87 च्या दरम्यानचा काळ असेल. नुकतीच मिसरूड फुटून.. केंद्र सरकारच्या नोकरीला लागलो. परिस्थितीमुळे नोकरीला चिकटणे भाग होते. त्यादरम्यान मा. शरद जोशी सरांची भाषणे ऐकली. शेती, माती, पाणी, यांच्यासाठी. त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढणारा हा योद्धा आम्ही पाहिला. विचाराने प्रेरित झालो. पण खूप चांगले,खूप जास्त साहित्य लिहिण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर काळ आला. ज्यांनी विचार दिला.. त्यांच्याच प्रेरणेने, विचाराने पेरलेली ही शब्दफुले साहित्य रूपाने प्रकाशित झाली.. त्याच शब्दांमुळे, अक्षरांमुळे, मला ओळख मिळाली..
रानात माझ्या...
 पान्हा फुटुनी.. हंबरते गाय..
 गुरा वासरांना प्रेम देत ..
चारापाणी घालिते माय ‌!! 
रानात माझ्या ..आई बा 
कष्टत माती पूजा.. पुन्हा पुन्हा..
 देई भरभरूनी ..धन धान्य 
देवी अन्नपूर्णा ..देवी अन्नपूर्णा !!

 
श्री बाळासाहेब देशमुख 
10, साहित्य लक्ष्मी, गुलमोहर रोड.
 सावेडी, अहिल्यानगर..४१४००३.
संपर्क नंबर..९४२३७९२१००.

=============


शेतकऱ्यांची व्यथा शेतकरीच जानतो माझे कृषी साहित्य तसे पुर्वीचेच पण् जेंव्हा मी शेतकरी साहित्य संमेलनात गायला लागलो लिहायला लागलो तेव्हा माझ्या शेतकरी साहित्यिक मित्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन माझी उमंग वाढवली किती तरी लोकांपर्यंत साहित्य या संमेलनामुळे पोहचुन माझी ही जाणिव जागृत झाली .

 
विष्णू हानते औताले घाई लक्ष्मीले निंध्याची ,
बळी आशीवर जगते आशा धरून उद्याची !!



साहेबराव तायडे, अकोला

==============


  • Log in or register to post comments
  • 13 views

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर
  • गंगाधर मुटे
  • डॉ. उपेंद्र बळ…

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 20 *
Who's new नवीन सदस्य
  • RATNESH CHAUDHARI
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अत्यंत अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि तितकाच संवेदनशील
    13 hours 41 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
    13 hours 45 minutes ago
  • दळवी सरांची दिवाबत्ती सुंदर…
    14 hours 8 minutes ago
  • लोकांना काय सांगू?
    16 hours 24 minutes ago
  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    17 hours 15 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Adsense

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ