Loading...
Skip to main navigation Skip to footer
Home
  • Create new account
  • Reset your password

Main Menu

  • नवे लेखन
  • अनुक्रमणिका
  • मुखपृष्ठ (opens in new tab)

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.

सुनील बावणे - निल

By अतिथी सदस्य | 10:13 PM IST, Thu January 16, 2025
A-210
50
8308334123
nilkavi74@gmail.com
Qtr. E 77 गुलमोहर पार्क बिल्ट पेपर मिल कॉलनी बल्लारपूर
बल्लारपूर
चंद्रपूर
शेतकरी गझल मुशायरा

१२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर.
सहभागी होण्यासाठी "अग्रिम नोंदणी" म्हणून माझी स्वलिखित गझल

वृत्त :- मेनका

*मैत्री करावी वाटते*

आजही मैत्री करावी वाटते
माणसे हृदयात यावी वाटते

त्यागुनी अवघ्या सुखाला या क्षणी
वेदना माझीच व्हावी वाटते

पालथे घालून आलो जग जरी
अंत व्हावा जन्मगावी वाटते

सोय होते चार घासाची तरी
आजही शेती करावी वाटते

शेतमालाला अगोदर योग्य ती
वाढुनी किंमत मिळावी वाटते

राबती शेतात जे हातात त्या
शासनाची दोर द्यावी वाटते

लावुनी गेली लळा जी पाखरे
ती परत घरट्यात यावी वाटते

सातव्या वर्गात होती ती परी
एकदा पुन्हा दिसावी वाटते

तोडगा काढायला प्रश्नांवरी
विठ्ठलाची भेट घ्यावी वाटते

✍️
सुनील बावणे - निल
बल्लारपूर, चंद्रपूर

  • Log in or register to post comments
  • 1 view

User account menu

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ