*नाती*
जोडले गणगोत सारी तुम्ही नव्याने
गणगोतात बांधली ती नाळ जुनी होती
पेटले आयुष्य होते नात्यात गुंतलेले
भेटली माणसे ती माझ्या मनात होती
नात्यात गुंतण्याची घेतली मी भरारी
माझ्याच सोबतीची गणगोत यार होती
फार नाही दूर गेली ती माणसे होती
फक्त आहे भेटणे ही आस मनी होती
मज कुणाशी भेटावया ओढ ती होती
भेटली प्रेमाची ती माणसे माझी होती
दूर ना गेली कधी ती माणसे माझी
काळजात कोरली अशी ती यारी होती
कवी , साईनाथ बालाजी रहाटकर
मु.पो. दगडगांव,
ता. लोहा,
जि. नांदेड
मो. 7350848348
पिन. क्रमांक, 431708