नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळी असेच कितीदा स्वतःला वामनाकडून गाडून घेणार?
राष्ट्राच्या प्रगतीचे किंवा विकासाचे खरे प्रतिबिंब हे ग्रामीण भागावरून कळत असते. ग्रामीण भाग राष्ट्राच्या समृद्धीचा, विकासाचा आरसा असतो. ग्रामीण भाग म्हटले की येथील मुख्य व्यवसाय बहुतांश शेती असतो. म्हणजेच राष्ट्राच्या विकासाचे एक पाऊल शेतीशी निगडित आहे. शेती म्हटल्यावर शेती कसणारा शेतकरीही राष्ट्राच्या विकासाचा एक प्रमुख आधारस्तंभ होतो. शेती आणि शेतकरी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे. देशाला अन्नधान्याने स्वयंपूर्ण करणे देशाची भूक भागविण्याचे काम शेतकरी वर्षानुवर्षे करीत आला आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा कणा शेती आणि शेतकरी होय. देशाच्या गौरवशाली इतिहासामध्ये शेतिचे योगदान अमूल्य आहे. शेतीचा स्वर्णिम इतिहास बघता आपल्या डोळ्यापुढे शेतकऱ्यांचा राजा बळीराजाचे चित्र उभे राहते. आजपर्यंतच्या इतिहासात झालेला एकमेव शेतकरी राजा म्हणजेच दानशूर बळीराजा होय. याच कारणाने आजही शेतकऱ्याला बळीराजा असे संबोधले जातात. बळीराजाचा गुण दानशूरपणा शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आजही बघायला मिळतो. त्याच्या दारी आलेला याचक खाली हाताने परत जात नाही.
दानत वृत्ती असलेला शेतकरी, आपले आणि देशाचे पोट भरण्यास सक्षम असलेला शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या मागे का पडत आहे? शेती आणि शेतकऱ्याच्या वैभवशाली परंपराला ग्रहण कसे लागले? जीवाची तमा न करता राब-राब राबणारा शेतकरी आत्महत्या का करत आहे? शेतीला दूर सारून मृत्यूला जवळ का करत आहे? खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात; आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे असतानाही शेतकरी स्वतःचा बळी का देतो? शेती विश्वातील बळीराजा कर्जाच्या गर्तेत कसा काय गटांगळ्या खात आहे? चिंतनीय बाब आहे. देशाला अन्नधान्यांनी स्वयंपूर्ण करणारा शेतकऱ्यांच्या भरवशावर अंशीं कोटी जनतेला मोफत धान्य पुरविली जाते; तो शेतकरी दोन हजाराची मदतरुपी भीक स्वीकारण्यास लाचार कसा काय झाला असेल? कारण एकच आहे आज पर्यंत त्याची झालेली लूट. सत्ताधीशांनी शेतकऱ्यांची आजपर्यंत लूटचा केली आहे. ज्याप्रमाणे बळीराजाला वामनाने पाताळात गाडले त्याचप्रमाणे आजही शेतकऱ्याला पाताळ्यात गाडण्याचे काम सुरू आहे. लुटीचे धोरण आजही राबविले जात आहे. बळीराजाला रंक बनविण्याची पाताळ यंत्रणा आजही राबविली जात आहे. मदतीच्या नावाखाली भीक द्यायला तयार असणारे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्यायला का तयार होत नाही? महागाई वाढेल म्हणून....नाही; नक्कीच नाही. इतर क्षेत्रांमध्ये ज्याप्रमाणे वाढ आणि फायदा असतो त्या प्रमाणात शेतीमध्ये का नाही? उत्तम व्यवसाय कनिष्ठ करण्यास सत्ताधीशांनी कुठेच कमीपणा जाणवू दिला नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे लुटून खैरातीमध्ये वाटण्यात राज्यकर्त्यांना धन्यता मानतात.
शेतीला लुटत आहे त्याची लूट होत आहे हे शेतकऱ्यांना कळत नसेल काय? सर्वच कळते. तो नवीन नवीन राजकीय पर्याय शोधत असतो परंतु तो पर्याय त्याची उपेक्षाच करतो. सत्तेत गेल्यावर राजकारण्यांना शेती आणि शेतकऱ्यांची विसर पडतो. बाकीच्या प्रजेचा खूप मोठा लळा निर्माण होतो. जो राजकीय पर्याय शेतकरी शोधतो तो पर्याय वामन बनवून त्याचाच बळी घेतो. ही कसली इडा पिडा शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, दुःख कुणाला कळत नसेल काय? कळते. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले आणि होत नसेल काय? प्रयत्न झाले आणि आताही होत आहे. शेतकऱ्यांना आता होत असलेली आणि येणाऱ्या भविष्यातील होणाऱ्या लुटीबद्दल सावध केले गेलेले आहे. आजही शेतकऱ्यांच्या विविध हितचिंतक संघटना हे काम शर्थीने करीत आहे. तरीपण शेतकरी वामनांनी टाकलेल्या जाळ्यात अडकून स्वतःचा बळी का देत असेल? याला अनुवंशिकताच म्हणावे लागेल. सर्वज्ञात आहे शेतकऱ्यांच्या राजा बळीराजाने त्यांच्या गुरुचे ऐकले नाही आणि आपला दनातपणा सिद्ध केला; तसेच आजही शेतकरी आपल्या आपल्या हितचिंतकाचे ऐकत नाही. आपले सर्वस्व गमावून समाजात पदोपदी विखुरलेल्या राजकीय वामणांना दान देण्यातच धन्यता मानून स्वतःचा बळी देखील देत आहे.
शेतकरी भावांनो आपले हित ओळखा. संधीसाधू ओळखा. आणखी किती दिवस आपले सर्वस्व गमावून धूर्त लोकांच्या प्रलोभनांच्या मागे लागून स्वतःचा बळी देत राहाल. आता आपल्याला स्वतःचा बळी न देता बळीचे राज्य आणायचे आहे. शेतकऱ्यांचे राज्य आणायचे आहे.
सतीश मानकर
9923637073
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सरजी
धन्यवाद सरजी
लेखन छान आहे.
लेखन छान आहे.
आभार सर
आभार सर
आजचा वामन भयानक आहे
आताच्या बळीराजा ने आपल्या वजनाचे गआडणआऱ्यआलआ गाडले पाहिजे..
सुनिल बावणे
आजचा वामन भयानक आहे हे आजच्या
आजचा वामन भयानक आहे हे आजच्या बळीला माहिती आहे तरीदेखील तो ....दान देतच आहे.
वाचकांनी प्रतिसाद द्यावा .
वाचकांनी प्रतिसाद द्यावा .
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण