दुबार पेरणी
तुझी झलक पाहूनी
पावसा खेळलो मी जुगार
बीज कोमीजली आता
नको घेवुस माघार
खेळ पाहूनी तुझा रे
खेळ माझा बिघडला
असं वाटते मनाला
डोळा तिसरा उघडला
आग पाहूनी रवीची
मन माझं होळपलं
तुझ्या जाण्यानं पावसा
उभं पीकं करपलं
काळी माय माझी मेघा
वाट तुझी पाही
लेकरू आहे रे दु:खात
थोडी करणारे तु घाई
बरस असा तू पावसा
शांत करणा रे धरणी
नकोसं झालं जीणं
नको दुबार पेरणी
नको दुबार पेरणी






प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! *congrats* :congrats: