पक्षी उडाले जलाशयातून
उल्का पडली अवकाशातून
दोघेंही जण असे धडकले
रक्तच निघाले नाकातून
उल्का ठरली निर्जीव दगड
निघतील भाव काय?त्या ह्रूदयातून!
पंख पक्ष्यांचे असे गळाले
पंखांसंगे स्वप्ने ही जळवून
हे ही राजे ते ही राजे
दोघांनाही सारखे प्राण
एक राजा चमकतो फरारीतून
एक राजा चमकतो भाकरीतून
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
***********************

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! *congrats* :congrats:
आपले खूप आभार सर.
Rajesh Jaunjal
आपले खूप आभार सर.