पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
शेतकरी काव्य
एक होती मावशी
एक होती आई, एक होती मावशी दोघीही सख्ख्याच पण मावशी पडली शेतकर्याच्या घरात अन् आई पडली नोकरदाराच्या घरात
एकदा काय झालं......... मावशी डोंगर चढली अन् पाय घसरून पडली पडली तर पडली पण कमरेतून मोडली वयाच्या साठीमधी कसं नशीब फ़ुटलं? कमरेचं हाड चार जागी तुटलं!
दवाखान्यासाठी घरामधला पैसा नाही पुरला केथ्या-मेथ्या झाडपत्तीविना इलाज नाही उरला
निदान काही कळले नाही सांधे काही मिळले नाही हाडं काही जुळले नाही
कधी रांगली, कधी घुसली माझ्या मावश्यावर मात्र कधीच नाही रुसली
शेवटी काय झालं? व्हायचं तेच झालं! ते यम नावाचं कार्ट वाजा घेऊन आलं!!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.