पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आला आला चड्डीवाला आला आला टोपीवाला त्याने घातलाय घाला त्याची नजर तिरकी फ़िरली ग बाई माझ्याsssss शेताला दिठ लागली ॥धृ०॥ होती ज्वानीत आली ज्वारी लक्ष्मी येतांना दिसलिया दारी धनी खुशीत नाचलाय भारी म्हणे भरतील कोठ्या-वखारी नजर पडली बुहार्याची टोपीवाल्या लफ़ंग्याची अन ज्वारीला लेव्ही लागली ॥१॥ सातासालात एक साल आलं शेतचांदण कापसात न्हालं झाड बोंडांनी लगडून गेलं जणू दुर्भाग्य खरडून नेलं यानं केली निर्यातबंदी आणली बाजारात मंदी अन कापसाची वाट लागली ॥२॥ केवळ मतांच्या जोगव्यासाठी अभय दाबतात आमचीच घाटी धनी राबून मरमर मरतो
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.