पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
घे मशाली
शासनाच्या सवे मेघही पांगले कास्तकारा तुझे दैवही बांधले
कोण देतो तुझ्या पाय पोटावरी का कळेना तुला नेमके चांगले
तेच झाले तुझे आज मारेकरी काल पायापुढे जे तुझ्या रांगले
झोप आली तुला जागता जागता त्याच पायी तुझे दैन्यही लांबले
काय अपराध माझा कळेना मला सांग जे कष्टले तेच का गांजले
इंडियाच्या गुलामीत ताजी सुखे भारताच्या घरी का शिळे रांधले
पारतंत्र्यात स्वातंत्र्य धास्तावले सैनिकांनो वृथा रक्त का सांडले
घे मशाली अभय आज हातामधी का असे शस्त्र खुंटीवरी टांगले
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.