पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
नागपुरी तडका
धकव रं श्यामराव
धकव रं श्यामराव झोल नको खाऊ नशिबाची गाथा नको कोणापाशी गाऊ ...!
रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा गारपिटानं कहर केला निसर्गानं कावा कंबरछाती गहू होता पुरा झोपून गेला उंबईचा फ़ुलोरा खड्डून झाडून नेला दोघाचंबी गर्हाणं सारखंच हाय भाऊ ...!
मार्केटात गेलो तर उलटे झाले गिर्हे खरीददार म्हणे ह्यो गहू होय का जिरे? आजकाल म्हणे याले कोंबडी खात नाही घेऊन जा वापस नायतर धडगत नाही नशीब धुवासाठी मी कोणत्या गंगेत न्हाऊ?....!
पदवीची पुंगी घेऊन पोरगं वणवण फ़िरते डोनेशनबिगर कुठं नोकरीपाणी मिळते? चपराश्याचा भाव सध्या सात लाख सांगते
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.