पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
शेतकरी काव्य
रे नववर्षा
रे नववर्षा ये नेमाने वल्हवीत अंकुर नवजोमाने एक कवडसा चैतन्याचा जा फुलवीत ही उदास राने ....!
ना अस्त्राने वा शस्त्राने उकलन व्हावी सद्भभावाने मत्सर-हेका ना गर्जन-केका बाहुबलीचे नको भुजाने .....!
दानवाने ना देवाने राज्य करावे बळीराजाने आत्मग्लानी क्लेश त्यजुनी जगावा पोशिंदा सन्मानाने ...!
रे नववर्षा दे अभयाने दे भरुनी दुरडी भगोणे वित्तपातल्या लक्तरांना भरव मुक्तीचे चार दाणे ...!
गंगाधर मुटे
.................................................................... (रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.