पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
माझी गझल निराळी
स्मशानात जागा हवी तेवढी
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे? तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती? हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?
तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?
जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता? सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?
कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी भिते ना कुणा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.