पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
बालकविता
मोरा मोरा नाच रे मोरा मोरा नाच रे अंकलिपी वाच रे वाचता वाचता बोल रे पृथ्वी कशी गोल रे गोल चेंडू उडला सूर्यावरती पडला कान त्याचा कापला म्हणून सूर्य तापला ऊन, हवा आणि गरम झाले पाणी पाणी गरम झाले वाफ़ होऊन आले सोडूनिया धरती वाफ़ गेली वरती आभाळात मग तिचे झाले ढग ढग वाजे गडगड वीज चमके कडकड वारा सुटला सो-सो पाऊस आला धो-धो मोरा मोरा नाच रे श्रावणाचा मास रे नाचता नाचता सारा फ़ुलवून दे पिसारा गंगाधर मुटे .................................................................. (रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.