पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
संमेलनाविषयी माहिती https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती https://www.baliraja.com/rep-regd
काव्यधारा
कविता
सरींचा कहर
पावसाची सर प्रेमाला बहर पण गळतेया घर गरीबाचे
सरींचा कहर प्रेमाला बहर पण फुटतोया नहर धरणाचा
सरींचा कहर प्रेमाला बहर पण बुजलाय दर उंदराचा
सरींचा कहर प्रेमाला बहर पण डुबलेय शहर पुराखाली
सरींचा कहर प्रेमाला बहर बगळा जमिनीवर उताना
सरींचा कहर प्रेमाला बहर पण जीवाला घोर या सरींचा
सरींचा कहर प्रेमाला बहर पाय घसरून कमर लचकली.
सरींचा कहर प्रेमाला बहर वाहून गेलाय खर कुंभाराचा
सरींचा कहर प्रेमाला बहर पण थंडीने वानर कुडकुडले.
सरींचा कहर कोसळले छप्पर मदत येईस्तोवर जीव गेला
गंगाधर मुटे ………………………………………
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.