नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

एवढा मोठा नांगूर...

नांगूर's picture

एवढा मोठा नांगूर...

काव्यप्रकार: 
कविता

एवढा मोठा नांगूर...
जिमनीगत गरिबीत घुसवाया पायजे...
पण बायला गरिबी त लिपलिया
तोंडावानी.
एवढी मोठी कणगी...
लिपाण काडायला दोन हात पुरत्यात
आन तोंडाचं लिपाण... गरिबीचा बूच...
शेणाच्या लिपणापेक्षा...
बळीच्या दंडापेक्षा...
पोचाट आण्णासायबाचा जुनाट कागद...?
सोडा रे... उचकटूया बाक्कन... कसं?