नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Gangadhar Mute

अशोक देशमाने's picture

हरी नाम रस...

काव्यप्रकार: 
अभंग

हरी नाम रस...

हा जीव नाशिवंत, न भरवसा क्षणाचा
राहो राम नाम ओठी, नको संग या जनाचा ।।१।।

बालपण खेळण्यात, तारुण्यात झाला घात
सत्कर्मी लागलो ना, ना मायेवर मात ।।२।।

सत्संग रोज करा, जनसेवा व्रत मनी धरा
आनंदाची वाहेल धारा, चोऱ्यांशीचा फिटेल फेरा ।।३।।

हरिनामाचा हा रस, पोहचेल अंतरंगी
दीनांचे जीवन हि, उद्धरेल तुम्हा संगी ।।४।।

-अशोक बाबाराव देशमाने