नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

गंगाधर मुटे's picture
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
गे माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
गे माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
गे माझे शिमगेमाय!

एका रंभेचं रुपडं भालू
दोन्ही गालाचे फ़ुगले आलू
रोज वेणीला लावते हेअरडाय
गे माझे शिमगेमाय!

एक अप्सरा बेलमांजर
हत्ती डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
गे माझे शिमगेमाय!

एक दणकट मल्ल शिपाई
तिला पिसीआर घेण्याची घाई
तिची मस्करी अभय तू करायची नाय
गे माझे शिमगेमाय!
                  - गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Share

प्रतिक्रिया

 • Nilesh's picture
  Nilesh
  सोम, 18/04/2016 - 17:18. वाजता प्रकाशित केले.

  सुंदर .....


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 12/03/2017 - 13:29. वाजता प्रकाशित केले.

  बळीराजा डॉट कॉमच्या सर्व सदस्यांना, वाचकांना, हितचिंतकांना होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!

  शेतकरी तितुका एक एक!


 • Dnyandev Raut's picture
  Dnyandev Raut
  रवी, 12/03/2017 - 23:33. वाजता प्रकाशित केले.

  मुटेजी आपल्या कवितेतील शिमगेमाय, छोर्याचं कौतुक, डोमड्या, पंजाबी मुर्हा म्हैस, भालू- आलू, बेलमांजर आदी शब्दकळेची पसरणं भौगोलिक सौंदर्याची आरास दर्शवून जातानाच शिमग्याची विविध रंगरूप जिवंतपणासह उभी राहतात. निमित्ताने बालपणीचा शिमगा आठवला.
  धन्यवाद व शुभेच्छा!