नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

चिमूरचे भाषण

गंगाधर मुटे's picture

चिमूरचे भाषण

शेतकरी बचाव संघटनेच्या वतिने आज दिनांक ३०-०८-२०१४ चिमूर जि. चंद्रपूर येथे शेतकरी मार्गदर्शन आणि प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मला प्रमुख अतिथी वक्ता म्हणून बोलविण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना एका विद्यापिठीय शेतकरी तज्ज्ञाने शेतकरी नवतंत्रज्ञान वापरण्यात कमी पडतो, शेतकर्‍याने शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन जर आधुनिक शेती केली तर शेतीमध्ये भरभराट होऊ शकते असे काहीसे विचार मांडले. हे विचार ऐकून माझं टाळकच फ़िरलं आणि मी बोलायला उभं होताच माझ्यातला शेतकरी जागा झाला व जे बोलायचे होते ते बाजूला राहिले आणि मग मी भलतंच बोलून गेलो. काही चुकले काहो?
- गंगाधर मुटे

चिमूरचे भाषण ऐका
------------------------------------------------------------

Share