Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शरद जोशी चरित्रलेखन:

योद्धा शेतकरी
शरद जोशी चरित्रलेखन:
निवेदन व आवाहन
           पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या 'अंतर्नादया मासिकाचे संपादक श्री. भानू काळे यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री. शरद जोशी यांचे चरित्र लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला असून शरद जोशी यांनी त्याला संमती दिली आहे. शेतकरी संघटनेच्या पाईकांना व शेतकरी संघटकच्या वाचकांना ठाऊक आहे की भानू काळे यांनी शरद जोशींच्या गौरवार्थ त्यांच्या 'अंतर्नादमासिकाचा ऑक्टोबर २००९ चा अंक 'शरद जोशी विषेशांकम्हणून प्रकाशित केला होता.
         संकल्पित चरित्रलेखनाच्या दृष्टीने भानू काळे यांनी माहिती जमविण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रात आणि भारतात दौरा करून शेतकरी आंदोलनाशी संबंधित व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या मुलाखतीतून माहिती जमवतील. चरित्रलेखनाचे हे काम वर्षभरात पुरे करण्याचा त्यांचा मानस असल्यामुळे शेतकरी आंदोलनाशी संबंधित सर्वच व्यक्तींना भेटणे त्यांना शक्य होईल असे दिसत नाही. त्यामुळेज्यांच्याकडे शेतकरी संघटनेची आंदोलने,मेळावेपरिषदाअधिवेशने इत्यादिसंबंधी वर्तमानपत्रेनियतकालिके यांतील कात्रणेफोटोशरद जोशींबरोबरील पत्रव्यवहारआणि शरद जोशींच्या सानिध्यातील अविस्मरणीय आठवणी अशा प्रकारचे काही साहित्य असेल ते त्यांनी उपलब्ध करून सहकार्य करावे अशी त्यांची इच्छा व विनंती आहे.
      श्री. शरद जोशींच्या चरित्रामध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या कालावधीला अत्यंत महत्त्व आहे हे लक्षात घेऊन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी,हितचिंतकांनी आपल्याकडे असलेले वरील प्रकारचे साहित्य
श्री. भानू काळे
संपादक 'अंतर्नाद'
सी-२गार्डन इस्टेट
वायरलेस कॉलनी जवळ
औंधपुणे - ४११००७
फोनः ०२०-२५८८३७२६
ई-मेल <bhanukale@gmail.com>
        या पत्त्यावर टपालाने किंवा कूरियरने पाठवून या चरित्रलेखनाच्या कार्यात सहकार्य करावे ही विनंती. साहित्य पाठविताना त्याच्या झेरॉक्स प्रती करून पाठवाव्यात.
पुन्हा एकदा सहकार्याची विनंती.
कळावे.
आपले,
रवि देवांगअध्यक्षशेतकरी संघटना सौ. शैलजा देशपांडेअध्यक्षमहिला आघाडीसंजय कोलेअध्यक्षयुवा आघाडी
अ‍ॅड्. वामनराव चटपअध्यक्षस्व.भा.प. सौ. सरोज काशीकरअध्यक्षमहिला आघाडीअ‍ॅड्. दिनेश शर्माअध्यक्षयुवा आघाडी
सुरेशचंद्र म्हात्रेसंपादकशेतकरी संघटक,  बद्रीनाथ देवकरसमन्वयकचरित्रलेखन प्रकल्प
Share