नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : सिंहावलोकन

गंगाधर मुटे's picture

५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन

         सिंह काही अंतर चालून गेला की, थोडे थांबतो आणि मागे वळून पाहतो आणि अवलोकन करतो. आपली पाच साहित्य संमेलने यशस्वीरीत्या पार पडलीत.  पाच संमेलनातून आपण काय कमावले व काय गमावले, चांगले काय केले आणि उणिवा काय राहिल्यात याविषयी शोध व बोध घेण्यासाठी सिंहावलोकन आवश्यक आहे.
         सर्वांना विनंती आहे की, आयोजकांचे कौतुक सोडून एकंदरीतच संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटते, याविषयी याच धाग्याच्या प्रतिसादात प्रत्येकानेच समीक्षण/सिंहावलोकन/सूचना/अभिप्राय लिहावा. त्यामुळे संमेलनाबद्दल तृटी/उणिवा/जमेच्या बाजू कळतील. पुढील वाटचाल करताना भविष्यात आपल्या बहुमोल सूचनांचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. 

आणि
        महत्वाचे म्हणजे लिहिणाऱ्याला लिहिण्याचा सरावही होईल. निव्वळ कविता/लेख/कथा/कादंबरी इतकेच साहित्य प्रकार हाताळल्याने मराठी शेतकरी साहित्य चळवळ समृद्ध होणार नाही. चळवळीला समीक्षक सुद्धा लागतील.

म्हणून उचला लेखणी.....!
आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्या ......!

-  गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

Share