नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शेतकरी साहित्य चळवळ : शेती साहित्य संसद - भाग - २

गंगाधर मुटे's picture

शेतकरी साहित्य चळवळ : शेती साहित्य संसद - भाग - २

कार्यवृत्त - याआधी संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाची संक्षिप्त माहिती :
 
Fingure-Right     २०१५ साली वर्धा येथे संपन्न झालेल्या १ ल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. विठठल वाघ लाभले होते. 
Fingure-Right     २०१६ साली नागपूर येथे संपन्न झालेल्या २ ऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून प्रा. सुरेश द्वादशीवार लाभले होते.
Fingure-Right     २०१७ साली गडचिरोली येथे संपन्न झालेल्या ३ ऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून डॉ. अभय बंग लाभले होते.
Fingure-Right     २०१८ साली मुंबई येथे संपन्न झालेल्या ४ थ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कविवर्य डॉ. विट्ठल वाघ यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अभिनेता श्री मकरंद अनासपुरे लाभले होते.
 
                  संपन्न झालेल्या चारही संमेलनाला कवी, गझलकार, वक्ते आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्तपणे भरघोस सहभाग लागला. राज्याच्या वेगवेगळ्या भागात संमेलन संपन्न झाल्याने दूरवर आणि दुर्गम ग्रामीण भागातली प्रतिभा शोधून त्यांना लिहीते-बोलते करण्यात यश मिळवतानाच त्यांना संमेलनाच्या आणि लेखनस्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठही उपलब्ध करून देता आले याचे समाधान आहे. कविसंमेलनात आणि गझल मुशायऱ्यात सहभागी होता यावे, अशी अनेकांची इच्छा असते पण संमेलनातील वेळेचे बंधन लक्षात घेता सर्वांनाच संधी देता येत नाही, हे नक्कीच बोचरे शल्य आहे. त्यावर पर्याय म्हणून ५ व्या संमेलनानंतर दरमहिन्याला प्रत्येक जिल्ह्यात एकदिवशीय एक छोटेखानी "शेती साहित्य संसद" आयोजित करण्याच्या शक्यतेवर गंभीरपणे विचार-विनिमय सुरु आहे. शेतकरी कविसंमेलन १ तास, शेतकरी गझल मुशायरा १ तास, परिसंवाद १ तास आणि खुली चर्चा १ तास असे या नियोजित "शेती साहित्य संसदेचे" स्वरूप असावे, अशी अपेक्षा आहे.
 
आपले सहकार्य अपेक्षित आहे!
 
- गंगाधर मुटे
Share