नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

धोरण

Rangnath Talwatkar's picture

धोरण

नशिबात आहे बा च्या
काळी ढेकळं ढेकळं
कधी मिळेल हो बापा
माझ्या कष्टाची भाकर !धृ!

किती कष्ट केले रानी
स्वप्न सजवूनी मनी
घास हिरावतो तोंडातून
कसा आहे रे हा पाणी
कशी जगतात बघा
काळ्या मायेची लेकरं
कधी मिळेल हो बापा
माझ्या कष्टाची भाकर !१!

बिज निघेल हे कसं
नाही राहीला भरोसा
जुगार खेळून शेतीचा
झाला रिकामा हा खिसा
चॉकलेट देऊनि बापा
घर केलीया पोकर
कधी मिळेल हो बापा
माझ्या कष्टाची भाकर !२!

बाप थकला रे माझा
भार कर्जाचा पेलून
गळ्या आवरतो दोर
झाडावर झुलून
छाया हरवूनी कशी
पोरकी झालीया पाखरं
कधी मिळेल हो बापा
माझ्या कष्टाची भाकर !३!

असं आलं ते हिरवं
कर्जमाफीचं गाजर
आशा प्रफुल्लीत झाल्या
आली आडवी माजर
थापा देवूनिया बापा
किती झालीया मुजोर
कधी मिळेल हो बापा
माझ्या कष्टाची भाकर !४!

कुठं गेले ते कैवारी
कुठं चाललं धोरण
पट्टी बांधूनी डोळ्याला
बघता बापाचं मरण
राख झालीत स्वप्नांची
कधी जागेल सरकार
कधी मिळेल हो बापा
माझ्या कष्टाची भाकर !५!

*गितकार*
- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त. समुद्रपूर जि.वर्धा
७३८७४३९३१२

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गीतरचना
Share

प्रतिक्रिया