नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

तू रे पोशिंदा जगाचा

ravindradalvi's picture

तू रे पोशिंदा जगाचा (वर्हाडी बोली )

तू रे पोशिंदा जगाचा तुले आन ह्या मातीची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!धृ!!

तू तं घेतं गळ्या फाशी माती होते रे पोरकी
तुह्या बीन सांग कस्यी आमी डोबू रे सरकी
उद्या ईचारीनं धुरा कोन्ती कायनी सांगाची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!१!!

संसाराचा भारं सांग कदी कोनाले चूकला
तूचं एकलाच कसा भोवऱ्याले रे भूलला
सोळ भोवऱ्याचं भेवं करं तयारी मनाची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!२!!

बीना पाण्याचे थ्ये ढग तुले दाखोते वाकोल्या
येते येते मनते निसत्या पयते सावल्या
आता ठेवं तू तयारी अभायाले खेचन्याची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!३!!

उभ्या वावराचा मालं नेते दलाल लूटूनं
अस्यी कस्यी होते जादू जाते भूलं रे पळूनं
ठेवं टपूरे तू आता काय कायजी कामाची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!४!!

तूह्या निढईचा घाम नीरा जाते रे वावूनं
तूह्यी भिस्त सारी तीतं तवा जाते रे जवूनं
मोज घामाचे तू दाम मांग किमंत घामाची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!५!!

तूह्या अस्या वागण्यानं सदा फावते रे त्याईचे
तूह्या मरणातं असते जगण रे त्याईचे
जरा तपासून घे तू आता कथा त्या बळीची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!६!!

आता शिक्वाचं पोराले मांग ठुवायचं नाई
शिक्शनाच्या नावानं तं बोटं मोळायचे नाई
धरं ईज्ञानाची कास आता प्रगती कराची
तू रे पोशिंदा जगाचा तुले आन ह्या मातीची
करू नोको गळ्या घाई आता जग सोळन्याची !!७!!

रविंद्र अंबादास दळवी
२०२ श्री.वल्लभ अपार्टमेंट, विधाते नगर.पखाल रोड,
वडाळा शिवार, नाशिक ४२२००६
९४२३६२२६१५

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गीतरचना
Share

प्रतिक्रिया