नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

करपलयं शिवार

लक्ष्मण खेडकर's picture

करपलयं शिवार
वाया गेलाय पेरा
धुसर झालीय
पावसाची आशा ,

हवालदिल झालेली
माणसं पहाताहेत
चातकासारखी
तलाठ्याची वाट .

मधमाशांसारखी
चिकटलीत लोकं
सेतु सेवा केंद्राला
7/12 साठी.

बॅंकाच्या दारात
उसळीय गर्दी
भल्या पहाटेचं
सुरु झालीय रेटारेटी

सगळी कुतरं ओढ
चाललीय
पीक विम्याचे
हप्ते भरण्यासाठी ,

आज दुष्काळाची भाषा
बोलणारे अधिकारी ;
उद्या एसीत बसून ठरतील
पिकाची आणेवारी.

शेवटी
पोकळ ,कोरड्या
आश्वासनाशिवाय
काय पडणार आहे ?
मातीत मळलेल्या
माणसांच्या पदरात .

--- लक्ष्मण खेडकर

9021068106

laxmainkhedkar25@gmail.com

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता
Share

प्रतिक्रिया