नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

लढू गड्यांनो

लक्ष्मण खेडकर's picture

उन्हात तान्हात राबून ,गेली हातपायाची सालपाटे.
पीक कर्जासाठी साले माराय लावतात हेलपाटे

चाळणी करतात अर्जाची आम्ही काय जोडलं खोटं
चुना लाऊन पळून गेली त्यांची काय उपटली शेट्टं?

बड्या धेंडाचं हजारो कोटीचं कसं कर्ज होतं माफ ?
सातबारा कोरा करा म्हटलं की लागतो त्यांना धाप.

तोंडात आलेला घास अनेकदा पाऊस नेहतो हिरावून .
कोरडं पाडतो घशाला, कधी नाचत जातो उरावरुन.

पदरात पडतो पसाखोंगा जेव्हा सोसून सतरा घाव
मोढ्यावर नेहला मालं कि कोसळतात बाजारभाव.

एसीत बसून,ख्या ख्या हसून सल्ले देतात भाडखाऊ
फाटल्यालं सांधतासांधता आधीच आलयं नाकीनऊ

आडवीलं ,नडवीलं त्याला. रुमन्याचा हिसका दाऊ.
मरायचं नाही, गड्यांनो!वेळ आली तर जेलात जाऊ.

--- लक्ष्मण खेडकर

9021068106

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता
शोधखुणा: 
Share

प्रतिक्रिया