नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

हालहाल पोचलेत कुंचल्यातही तुझे

Dhirajkumar Taksande's picture

राज्यकार जीव घेत यंत्रणेतही तुझे.
हीत साधता न येत धोरणासही तुझे.

संविधान आपल्यास कवच देत हे तरी.
हक्क मारतात रोज भारतातही तुझे,

गावठात शेष एक फक्त पीठ गीरणी,
आजकाल मोडलेत रोजगारही तुझे.

ध्वस्त रे शिवार आॅल इंडियात जाहले,
काय काय अंकुरेल या दशेतही तुझे.

लीन मग्न भाषणात शोधण्यात उत्तरे!,
प्रश्न सूटतील काय या सभेतही तुझे.?

चित्र काढतो परी निराश रूप उमटते,
हालहाल पोचलेत कुंचल्यातही तुझे.

'धीर' तापले जहाल धोरणात शासकी,
माळरान भीजले न पावसातही तुझे.

वृत्त :~चामर
लगावली :~गालगाल गालगाल गालगाल गालगा

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया