नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

"खोटेच पंचनामे"

Ramesh Burbure's picture

"गझल"

लाखो किसान मेले, फसव्याच धोरणाने..!
खोटे हिशेब सादर, केलेत शासनाने..!

त्यांना हवे तसे मग, केलेत पंचनामे,
शेतातल्या शवांचे, आपापल्या मनाने..!

रबरासमान आहे, ताणून कर्ज माझे,
देतोय जीव मी या, एकाच कारणाने..!

अन्नास खुद्द आता, मोताद अन्नदाता,
झाला बळी कुपोषित, त्यांच्याच शोषणाने..!

नुसत्याच गाव गप्पा, करतेय हे प्रशासन,
ध्यानात घेतले का ?, हे सत्य बहुजनाने..!

__रमेश अरुण बुरबुरे
मु. निंबर्डा, पो.शिरोली
ता.घाटंजी, जि.यवतमाळ
पिन कोड : ४४५३०१
मोबाईल नंबर : ९७६७७०५१७०
ई मेल आयडी : burbureramesh@gmail.com

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया