नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

दारिद्र्य

मुक्तविहारी's picture

दारिद्र्य

इथे रोज आम्ही
राबतो मातीत
तरीही पोटात
पोकळीच ...

आमुच्याच असे
डोक्यावर ओझे
कर्जाचेही बोझे
नेहमीच ...

पुढारी ते नेते
बंगल्यात स्वस्थ
पैसेही ते फस्त
करतात ...

पत्नीला आमुच्या
फाटकीच नाटी
मारलेल्या गाठी
मनालाही ...

आम्हीच इथे का
मळलो जळलो
दुःखाने पोळलो
दारिद्र्याच्या ...

आम्हीच करतो
मरणाचे कष्ट
दिसते हे स्पष्ट
नेहमीच ...

दारिद्र्य आमुच्या
नशिबी का देवा
जन्माचा तो ठेवा
हाच का रे ? ...

- मुक्तविहारी,
क्वार्टर क्र. जुने डी - ८ ,
थर्मल काॅलनी, परळी वैजनाथ - ४३१५२०.
मो. ९८६०९८५९११.
इमेल : muktvihari@gmail.com

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता
Share

प्रतिक्रिया