नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

"ग्राम पंचायत" मोबाईल ऍपचे लोकार्पण

"ग्राम पंचायत" मोबाईल ऍपचे लोकार्पण

पंचायतराज व्यवस्थेची कार्यप्रणाली सुलभतेने समजण्यासाठी आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी साहाय्यभूत ठरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल फ्रेंडली "ग्राम पंचायत" मोबाईल ऍपचे सरपंचा सौ. प्रतिमा प्रवीणराव परमोरे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ग्राम पंचायत - ऍप

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीच्या शुभपर्वावर लोकार्पण करण्यात आलेल्या या ऍपच्या माध्यमातून ग्रामपंचायतसाठी विविध शासकीय योजना, काही महत्वाचे ग्रामपंचायतशी संबंधित GR, महत्वाच्या लिंक्स तसेच अन्य तांत्रिक व उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच वेळोवेळी माहिती अद्ययावत करून त्यात भर घातली जाणार आहे. जेणेकरून ऍपचा सहजसुलभ वापर करुन गावविकासासाठी ग्राम पंचायतचे पदाधिकारी, सचिव तसेच सर्वसामान्य नागरिकांना एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

"पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रीद घेऊन कार्य करणारी "शेती अर्थ प्रबोधिनी" ही सामाजिक संस्था असून शेती विषयक कार्य करतानाच गावगाड्याविषयी काही रचनात्मक कार्य करण्याचे उद्देशाने या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. लोकार्पण सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष गंगाधर मुटे, प्रवीण परमोरे, कपिल खोडे, कैलास जयपूरकर, दिवाकर परमोरे, सुरेश बांदरे, सौ. पुष्पाबाई जगताप आदी हजर होते.

"ग्राम पंचायत" मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोअर मध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.

"ग्राम पंचायत" मोबाईल ऍप डाउनलोड करण्यासाठी   Fingure-Right    येथे क्लिक करा.

Share