नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना

योजनेचा उद्देश : राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.
 
योजनेच्या प्रमुख अटी : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त १८ ते ६५ वर्षाखालील वयोगटातील ८० % हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहूअपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.२००/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.४००/- प्रतीमहा असे एकूण रु.६००/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.
Share