नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार

अटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार

गरीब, असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्यरेषेखालील जनता यांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर व्हावे यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. यामुळे सर्वच नागरिकांना वृद्धापकाळात पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने सर्वांना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन जाहीर केली आहे. अटल पेन्शन योजनेविषयी माहिती देणारा हा लेख..

अटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन पद्धतीद्वारे संचालित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरणाद्वारे नियमित केले जाते. ही योजना 1 जून 2015 पासून कार्यान्वित झाली आहे. या योजनेत पेन्शनधारकाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून पेन्शन मिळणार आहे. योजनेसाठी सरकारला खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास सरकारने दिलेली वर्गणी व त्यावरील व्याज हे परत घेण्यात येईल. वर्गणीदाराला महिन्याच्या कोणत्याही तारखेला पैसे भरता येणार. मात्र हप्ता चुकल्यास बँकेच्या नियमानुसार दंड भरावा लागेल. 

योजनेचे निकष
या योजनेत 18 ते 40 वर्षांची कोणतीही व्यक्ती सामील होऊ शकते. ही योजना सर्व बचत बँक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे. वर्गणीदाराने कमीतकमी 20 वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत. योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्डला मुलभूत के.वाय.सी. दस्तावेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून 60 वर्षांच्या आत बाहेर पडता येणार नाही. (अपवादात्मक परिस्थितीत वर्गणीदाराचा आकस्मिक किंवा आजाराने मृत्यू)

लाभाचे स्वरुप
जे वर्गणीदार 18 ते 40 या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी एक हजार ते पाच हजार प्रतिमाह पेन्शन मिळेल. या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी एक हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या 50 टक्के रक्कम जमा करणार आहे. 31 मार्च 2016 पूर्वी उघडलेल्या नव्या खात्यामध्ये सरकार पाच वर्षासाठी प्रिमियमच्या 50 टक्के (1 हजार रुपयांपर्यंत योगदान देणार आहे) सरकार ही रक्कम फक्त अशा वर्गणीदारांना देईल, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सामील नाहीत. वर्गणीदाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार, पाच हजार रूपयांची पेन्शन कायमस्वरूपी वयाच्या 60 वर्षांपासून मिळेल. कोणत्याही बँक बचत खात्यातून परस्पर रक्कम जमा होऊ शकते. स्वावलंबन योजनेचे सभासद आपोआपच अटल पेन्शन योजनेत जोडले जातील. 

वारसाला लाभ
अटल पेन्शन योजनेतील वर्गणीदाराच्या वारसांनाही लाभ मिळणार आहे. एक हजार पेन्शनसाठी 1.7 लाख जमा राशी तर दोन हजार पेन्शनसाठी 3.4 लाख रूपये, तीन हजार पेन्शनसाठी 5.1 लाख रूपये, चार हजार पेन्शनसाठी 6.8 लाख रूपये आणि पाच हजार पेन्शनसाठी 8.5 लाख रूपयांची जमा राशी वारसांना मिळणार आहे.

- विष्णू काकडे
माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग

Share