Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



३ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन

३ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन

नमस्कार मंडळी,

२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले आणि २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले. आता तिसर्‍या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात आणि कामाला लागुयात.
पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.

  • दोन साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्‍यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर ३०/१०/२०१६ पूर्वी संपर्क साधावा.
  • अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद हिशेबाकरिता एक वर्षापूर्वी "शेती अर्थ प्रबोधिनी" ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. सबब पुढील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शीपणाने संस्थेच्या मार्फतच चालतील. इच्छुक व्यक्ती/संस्था/प्रतिष्ठन यांच्याकडून देणगी स्वरुपात निधी स्विकारला जाऊ शकतो. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.
  • अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून नुकतीच विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ लेखनस्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचा विषय आव्हानात्मक असल्याने फ़ारशा प्रवेशिका येणार नाहीत, असा अंदाज होता पण एकूण ९२ प्रवेशिका स्पर्धेत दाखल झाल्या आहेत. ही उत्साहवर्धक बाब आहे. प्रवेशिका वाचनासाठी http://www.baliraja.com/spardha-2016 येथे उपलब्ध आहे.
  • दुसर्‍या अ.भा.शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह - कणसातली माणसं" प्रकाशित केला होता. यावर्षी दुसरा प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह प्रकाशित करावा, अशी अनेकांनी इच्छा व्यकत केली आहे. दरवर्षी प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह प्रकाशित करणे सहभागींसाठी आर्थिकदृष्ट्या अवघड असले तरी अशक्यही नाही. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर ३०/१०/२०१६ पूर्वी संपर्क साधावा.
  • मोबाईलधारकासाठी खास : बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांनी मोबाईल आवृतीचा वापर करायला हरकत नाही. डाव्या बाजुच्या विजेट्मध्ये मोबाईल स्विच या ब्लॉकमध्ये Desctop आणि Mobile असे दोन पर्याय आहेत. पैकी सोईचा व आवडता पर्याय निवडावा. आशा आहे की मोबाईल आवृतीचा वापर केल्यास संकेतस्थळाचे अवलोकन अथवा संकेतस्थळावर लेखन करणे अधिक सुलभ ठरू शकेल.
  • आपल्या सुचनांचे स्वागत आहे.

    आपला स्नेहांकित

    गंगाधर मुटे
    संस्थापक अध्यक्ष
    अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळ

Share