नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

एवढा मोठा नांगूर...

नांगूर's picture
काव्यप्रकार: 
कविता

एवढा मोठा नांगूर...
जिमनीगत गरिबीत घुसवाया पायजे...
पण बायला गरिबी त लिपलिया
तोंडावानी.
एवढी मोठी कणगी...
लिपाण काडायला दोन हात पुरत्यात
आन तोंडाचं लिपाण... गरिबीचा बूच...
शेणाच्या लिपणापेक्षा...
बळीच्या दंडापेक्षा...
पोचाट आण्णासायबाचा जुनाट कागद...?
सोडा रे... उचकटूया बाक्कन... कसं?

Share

प्रतिक्रिया

 • admin's picture
  admin
  सोम, 13/06/2011 - 20:21. वाजता प्रकाशित केले.

  स्वागतम नांगूर,

  बळीराजा डॉट कॉमवर पहिली कविता लिहिण्याचा मान तुम्ही मिळवला.

  धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...! Smile


 • नांगूर's picture
  नांगूर
  मंगळ, 14/06/2011 - 11:26. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद!


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 14/06/2011 - 12:50. वाजता प्रकाशित केले.

  नांगूर... म्हणजे नांगर काय?

  कणगी...
  पोचाट
  बाक्कन

  या शब्दाचे अर्थ माहित नसल्याने निटसा उलगडा झाला नाही.
  कृपया शब्दांचे अर्थ द्यावेत.

  पुरेसा अर्थ न कळताही कविता मात्र दमदार वाटली.

  धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...! Smile

  शेतकरी तितुका एक एक!


 • दत्ता राऊत's picture
  दत्ता राऊत
  सोम, 27/06/2011 - 09:16. वाजता प्रकाशित केले.

  छान कविता.
  शब्दाचे अर्थ मलाही कळले नाहित.

  जय गुरूदेव


 • प्रमोद देव's picture
  प्रमोद देव
  मंगळ, 28/06/2011 - 08:22. वाजता प्रकाशित केले.

  नांगूर... म्हणजे नांगर काय?
  होय..नांगरच!

  कणगी...धान्य साठवण्यासाठी केलेली बांबुची मोठी व उभट टोपली(हारा)
  पोचाट...पुचाट,दुर्बल,नामर्द
  बाक्कन....भस्सकन


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 30/06/2011 - 11:29. वाजता प्रकाशित केले.

  शब्दांच्या अर्थाबद्दल धन्यवाद. Smile

  हे शब्द महाराष्ट्राच्या कोणत्या भागात वापरले जातात?

  शेतकरी तितुका एक एक!


 • सौरभ's picture
  सौरभ
  मंगळ, 05/07/2011 - 20:31. वाजता प्रकाशित केले.

  सुंदर कविता.


 • कॅप्टन Carf's picture
  कॅप्टन Carf
  शुक्र, 15/07/2011 - 20:41. वाजता प्रकाशित केले.

  चांगली आहे.