नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

पाऊले चालली पंढरीची वाट

गंगाधर मुटे's picture

मी माझ्या मामासोबत (वय : नाबाद १०० ) पंढरपूर तिर्थयात्रा करून आलो. सोबत मावशी (वय : ८० ) होती.
त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत प्रवास अत्यंत काळजीपूर्वक करावा लागला.

दिनांक ५ जुलै ते ७ जुलै : वर्धा - यवतमाळ - पुसद - हिंगोली - औंढा - परभणी - परळी - अंबाजोगाई - लातूर - तुळजापूर - पंढरपूर - नगर - शिंगणापूर
********************************************************

Pandharpur
********************************************************

Pandharpur
********************************************************
औंढा नागनाथ : ज्योर्तिलिंग

संत नामदेव औंढा नागनाथला आले असता त्यांना तेथे कीर्तन करू दिले नाही म्हणून त्यांनी मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन सुरु केले.
मग नागनाथाने मंदीर फिरवून नामदेवाकडे तोंड केले. म्हणून या मंदीराचे तोड़ पश्चिमेस आहे. अशी वंदता आहे.

Pandharpur
********************************************************
ताज्या अन्नाशिवाय काहीही न गिळणाऱ्या घशाला आव्हान देत परळी बैजनाथाच्या पायरीवर बसून पहाटेची शिदोरी रात्री 11.30 वाजता खाण्याचा निर्णय घेतला.

Pandharpur
********************************************************
आदरातिथ्याबद्दल आभार Raj Pathan Sir __/!\__

Pandharpur
********************************************************

Pandharpur
********************************************************

Pandharpur
********************************************************

Pandharpur

********************************************************

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 29/01/2019 - 00:00. वाजता प्रकाशित केले.
  मामाश्रींचे वैकुंठगमन
   
  आमचे मामा गोविंदराव धरमुळ वय १०३ वर्षे ७ महिने त्यांचे आज दिनांक २८-०१-२०१९ रोजी कुठलाही आजार न होता विनाआजारानेच देहावसान झाले. वैशिष्टयपूर्ण बाब अशी कि परवाच्या दिवशी ते मला परवा पंढरपूरला जायचे आहे असे लोकांना सांगत सरपंचांना सांगून येतो असे म्हणत सरपंचाच्या घराकडे गेले होते. मी उद्या पंढरपूरला जाणार आहे असे काल ते लोकांना सांगत होते.
   
  आज सकाळपासून मी पंढरपूरला जाणार आहे असे सर्वांना सांगात होते. म्हातारपणामुळे आलेला स्मृतिभ्रम असे समजून सर्वांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.
  आज ते गावाबाहेर नदीजवळ संडासला जाऊन आले. घरासमोरील मुख्य रस्त्यावर ते इकडे तिकडे सहज फिरले. म्हणजे आजच्या शेवटच्या दिवशीही ते विनाआधाराने एकटेच अर्धा ते १ कि.मी पायी फिरले. मागच्या महिन्यापर्यंत ते सहज ३-४ कि.मी. फिरत असायचे. एका वर्षाआधी म्हणजे वयाच्या १०२ व्या वर्षी ते एकटेच सेलूला ३ कि.मी. जाऊन परत यायचे.  
  आज ते १० वाजता जेवायला बसले. पहिला घास घेतला आणि तो घास गिळण्याआधीच पंढरपूरला निघून गेलेत. तोंडातला घास तोंडातच राहिला.
   
  मामा गेले याचे दु;ख नाहीच, ते १०३ वर्षे जगले याचा आनंद आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्रद्धांजली वाहण्याचेही कारण दिसत नाही कारण स्वआत्म्याला शांती मिळवण्यासाठी ते स्वतःच समर्थ आहे असे वाटते.
   
  मुख्य प्रश्न असा कि ते स्वतःची वेळ ठरवून आपल्यातून अगदी सहजपणे निघून गेलेत. युगात्मा शरद जोशी शेतकरी चळवळीतील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे १२ डिसेंबर या दिवशीच गेलेत. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रवी देवांगही १२ डिसेंबर या दिवशीच गेलेत. 
   
  या लोकांना हे कसे शक्य झाले असेल? हाच मुख्य प्रश्न ...!
  या प्रश्नाचे उत्तर आधुनिक विज्ञानाकडे नसेल तर ज्याला आपण प्रगत विज्ञान म्हणतो ते प्रगत विज्ञान नसून बाल्यावस्थेतील  प्रगतीशील विज्ञान आहे, असे म्हणावे लागेल.
   
  खोटी असतील, तर्कहीन असतील, निराधार असतील पण या प्रश्नांची उत्तरे अध्यात्माकडे आहे. जो पर्यंत विज्ञान अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे देण्याइतपत समर्थ होत नाही, तो पर्यंत आम जनतेवर विज्ञानाचा नव्हे तर अध्यात्माचाच प्रभाव आणि वर्चस्व राहणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
   
  - गंगाधर मुटे

  शेतकरी तितुका एक एक!