Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



रामराम मंडळी

या मंडळी,
आपले स्वागत आहे.

येथे सदस्य आपसात चर्चा, विचारपूस, क्षेमकुशल, हालहवाल
किंवा पाऊसपाणी अर्थात अनौपचारिक चर्चा करू शकतात.

कोणी ऑनलाईन आहे का आता? Smile

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 25/06/2011 - 20:35. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार देव साहेब..
    आपण नियमितपणे भेट देत असता, याबद्दल आनंद वाटतो.

    शेतकरी तितुका एक एक!

  • प्रमोद देव's picture
    प्रमोद देव
    रवी, 26/06/2011 - 13:07. वाजता प्रकाशित केले.

    काय हालहवाल आहे? तुमच्या तिथे पाऊस-पाणी कितपत झालंय?

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 26/06/2011 - 13:15. वाजता प्रकाशित केले.

    कालपर्यंत फ़ारच वाईट स्थिती होती. पण काल बरसला आणि समाधान झाले. आता पेरण्या बर्‍यापैकी साधतील असे चित्र आहे. Smile

    शेतकरी तितुका एक एक!

  • प्रमोद देव's picture
    प्रमोद देव
    रवी, 26/06/2011 - 13:26. वाजता प्रकाशित केले.

    खुली ठेवा मुटेसाहेब....खरडफळ्यासारखी.
    हे प्रत्येकवेळा प्रतिक्रियेसाठी नवीन पान उघडणे बरोबर नाही वाटत.
    तसंच चावडीवर नवी आलेली प्रतिक्रिया लगेच पान ताजं न करताही दिसायला हवी अशी काही व्यवस्था नाही का करता येणार...थोपुवर दिसते तशी?
    मुंबईतला पाऊसही गेला आठवडाभर पार गायब झालाय...पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारा सुरु आहेत.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 26/06/2011 - 13:34. वाजता प्रकाशित केले.

    होय.
    याला वाहता बातमीफलकासारखे स्वरूप द्यायचा प्रयत्न आहे. Smile

    शेतकरी तितुका एक एक!

  • Andi2702's picture
    Andi2702
    सोम, 27/06/2011 - 12:11. वाजता प्रकाशित केले.

    रामराम, नमस्कार, सलाम वालेकुम मंडळी.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 29/06/2011 - 09:33. वाजता प्रकाशित केले.

    लक्ष्मणराव,
    आपले स्वागत आहे. Smile

    शेतकरी तितुका एक एक!

  • लक्ष्मण's picture
    लक्ष्मण
    बुध, 29/06/2011 - 09:40. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार मुटे साहेब आमचा प्रवेश झालेला आहे

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 30/06/2011 - 11:26. वाजता प्रकाशित केले.

    बाकी काय चाललंय? मी पुढल्या महिन्यात पुण्याला येणार आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • कॅप्टन Carf's picture
    कॅप्टन Carf
    शुक्र, 15/07/2011 - 21:45. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार मंडळी. Smile

  • प्रशान्त कराळे's picture
    प्रशान्त कराळे
    शनी, 03/09/2011 - 19:49. वाजता प्रकाशित केले.

    आदरणीय मा. शरद जोशी साहेब,

    आज आपला वाढदिवस!!
    तिमिरातून प्रकाशाची वाट आपण दाखवली,
    म्हणूनच आमचे जगणे सुसह्य झाले,
    घामाचे दाम घेण्याचे आपण शिकवले,

    आदरणीय साहेब,
    दयाधन परमेश्वर आपणास निरामय उदंड आयुष्य देवो....!!!!!!!!

    प्रशांत कराळे
    देवळाली प्रवरा

  • रामेश्वर चांडक's picture
    रामेश्वर चांडक
    बुध, 19/10/2011 - 21:47. वाजता प्रकाशित केले.

    खरे पाहता रबी हंगाम हा पूर्णपणे विहिर व पाटपाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगामातील कापूस, तूर, ऊस ई. तर रबी हंगामातील गहु, हरभरा, भाजीपिके ही सर्व उपलब्ध पाण्याशी निगडीत पिके आहेत. या पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास त्यांचे उत्पादकतेमध्ये मोठी घट येते. म्हणून कृषी क्षेत्रात याकाळात विजेचे फार महत्त्व आहे. परंतु सध्याची विजेची परिस्थिती पाहता शेतीमध्ये फक्त आठ तास विज उपलब्ध आहे. भविष्यामध्येही विजेची हीच परिस्थिती राहणार आहे. यासाठी शेतकरी बांधवानी शेतीतील विजेचा वापर काटेकोर पध्दतीने कसा करता येईल याकडे पाहणे गरजेचे झालेले आहे. काय केले म्हणजे आहे त्या पाण्याचा योग्य वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र भिजवणे शक्य होईल?
    आज आपण रात्री-बेरात्री विज येते म्हणून मोटारींना ऑटो स्टार्टर लावले आहे. यामुळे ऐन हंगामात मोटारी जळण्याचे प्रमाण तर वाढले आहेच. त्याच बरोबर वींचु काट्यांमध्ये अवेळी शेतामध्ये थांबुन पिकांना पाणी देण्याचे काम करावे लागत आहे. भविष्यातील शेतीचा विचार करता आता शेतात पिक पध्दतीतील बदला प्रमाणे अधुनिक तंत्राचा वापर सिंचनासाठी करणे काळाची गरज झालेली आहे. यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, विशेषतः फळबागांसाठी डिफ्युजर पध्दत यांचा वापर आवश्यक झाला आहे. त्याच बरोबर मोकळे पाणी देतांना जमिनीच्या प्रकारानुसार कोळपणी किंवा खुरपणी नंतर जमिनीच्या भेगा बुजल्यानंतर केल्यास रान लवकर भिजण्यास मदत होते.
    या सोबतच रबी आणि उन्हाळी हंगामात पाणी वापर कमी करण्यासाठी काही रसायणेही आता बाजारात उपलब्ध झालेली आहेत. ती मातीत किंवा शेणखतात मिसळून शेतात टाकली आणि त्यानंतर पाणी दिले असता नंतर पाण्याच्या पाळीमधील अंतर वाढवता येते. उन्हाळ्यात पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी अँटीस्ट्रेसची फवारणी करून पिकांना लागणारे पाणी कमी करता येणे शक्य आहे.
    शेतक-यानी आता काळा बरोबर स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे झालेले आहे. जर आज विजेबाबत जागरूकता आपल्यात आली नाही तर पुढे आपले फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज व आत्तापासूनच विज बचतीसाठी सर्व शेतक-यांनी प्रयत्न करावेत एवढीच विनंती.

    रामेश्वर चांडक
    जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक
    बीड

    रामेश्वर चांडक

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 19/10/2011 - 22:27. वाजता प्रकाशित केले.

    सहमत आहे चांडक साहेब.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 12/12/2014 - 22:29. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार मंडळी,
    येथे खालील प्रतिसादात आपण विचारपूस किंवा काही समस्या असल्यास विचारू शकता.

    शेतकरी तितुका एक एक!

  • Raosaheb Jadhav's picture
    Raosaheb Jadhav
    शनी, 22/10/2016 - 20:32. वाजता प्रकाशित केले.

    आदिनाथ टाकते
    यांचं लेखन वाचता येत नाही

    रावसाहेब जाधव (चांदवड)

  • admin's picture
    admin
    शनी, 22/10/2016 - 21:11. वाजता प्रकाशित केले.

    तो लेख आता अप्रकाशित केला आहे.

  • shrikant dhote's picture
    shrikant dhote
    गुरू, 29/12/2016 - 21:50. वाजता प्रकाशित केले.

    जगाची भुक भागविण्यास,
    बापाने हाती घेतला तुत्या,
    भुक भागवता भागवता सरला,
    अन् शेवटी हाती राहीला तुत्या.........

    किती राबले बैल आणिक,
    किती नांगरल्या खटी,
    बैलही सरले खटीही मुरल्या,
    राहिला तुत्याच हाती शेवटी......

    श्रीकांत धोटे
    टाकळी चनाजी जि. वर्धा

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 03/01/2017 - 11:31. वाजता प्रकाशित केले.

    तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

    दिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७
    स्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली

    कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी

    नमस्कार,

    तिसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्‍यात सहभागी होऊ इच्छीणार्‍या कवी आणि गझलकारांना याद्वारे सादर निमंत्रित करण्यात येत आहे.

    नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.

    नोंदणीसाठी http://www.baliraja.com/node/1075 हा धागा वापरावा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • विनिता's picture
    विनिता
    मंगळ, 03/01/2017 - 12:11. वाजता प्रकाशित केले.

    मुटे सर,

    शेतकरी संमेलनात मी नेहमीच नवीन रचना सादर केली आहे.
    आत्ताच नावनोंदणी केली आणि उत्स्फुर्तपणे सुचलेली एक रचना पण कागदावर उतरवली.
    हे शेतकरी संमेलनाचेच श्रेय म्हणावे लागेल. या प्रकारे का होईना मी शेतकर्‍यांशी जोडले गेले आहे.